Sunday, November 24, 2019

पर्यावरणाचे प्रकार

पर्यावरणाचे प्रकार

    वरील सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण अशी शब्दश: व्याख्या विविध पर्यावरण अभ्यासकांनी केली  आहे. याचा अर्थ म्हणजे भू- भागावरील सोभावतालची नैसर्गिक घटक व मानव निर्मित घटक  मिळून पर्यावरणाची निर्मिती होते. या नैसर्गिक व मानव निर्मित पर्यावरणावर मानवाची मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा अवलंबून आहे.पर्यावरणाचे साधारणपणे दोन प्रकार आहे ते पुढील प्रमाणे 

नैसर्गिक पर्यावरण :


types of environment in marathi,paryavaran

नैसर्गिक पर्यावरण 

 पृथ्वीच्या भू- भागावर प्राकृतिक किंवा नैसर्गिक  घटक नैसर्गिकरित्या  निर्माण होतात त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हणतात.  नैसर्गिक पर्यावरणात पाणी,हवा, मृदा, जंगल, प्राणी, जैविक घटक,हवामान, वातावरण इत्यादी घटकाचा अभ्यास केला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिक पर्यावरणात विविधता आढळते. त्यामुळे भारताच्या प्राकृतिक रचनेत सुद्धा भिन्नता दिसून येते. जसे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत, गंगेच्या सुपीक मैदान, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा    उपसागर,पश्चिमेला अरबी समुद्र व पश्चिम घाट आहे. 

मानवनिर्मित पर्यावरण :

paryavaran prakar in marathi, पर्यावरण प्रकार पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे घटक  मानवनिर्मित तयार होतात त्याला मानवनिर्मित पर्यावरण किंवा सांस्कृतिक पर्यावरण असे  म्हणतात. मानवाने आपल्या बुद्धी  जोरावर भू-भागावर आपल्या व्यवसायात अमुलाग्र बदल केला आहे.मानवनिर्मित पर्यावरण गतिमानशील झाले आहे.लोकसंख्या , मानवी वसाहती, रस्ते, हवाईमार्ग, जलमार्ग, रेल्वे , उद्योगधंदे व वाहतूक व दळणवळण, बाजारपेठ इत्त्यादी  घटकाचा अभ्यास मानवनिर्मित पर्यावरणात केला जातो.मानवाची प्रगतीत दिवसान दिवस वाढ होत आहे. मानवाच्या या  पर्यावरणात वास्तव्यअसल्यामुळे राहणीमानात सुद्धा बदल झाला आहे.

8 comments: