Monday, May 9, 2022
Wednesday, October 13, 2021
भारतीय अवकाश संघटना (Indian Space Association)
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक ११/१०/२०२१ रोजी भारतीय अवकाश संघटनेची म्हणजेच Indian
Space Association ( ISA ) ची स्थापना
केली. अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची प्रगती दिवसान
दिवस वाढत आहे. दरवर्षी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाण भारतीय अवकाश संशोधन
विभागाला निधी दिला जातो.
Indian
Space Association हि संघटना
अवकाश
तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या
वाढत्या गरज पुर्ण करण्यास ही संघटना मदत करणार आहे. या संघटनेचे नेतृत्व अर्थात
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोकडे (Indian Space Research Organization)
असणार
आहे. देशातील वाढता इंटरनेटचा वापर, कृत्रिम उपग्रहांची
गरज लक्षात घेता देशातील खाजगी कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सहभाग
वाढवणे गरजेचे आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या नियमा अंतर्गत देशातील खाजगी कंपन्यांना
प्रोत्साहन देण्याचे काम या संघटनेनेमार्फत इस्त्रो करणार आहे. त्यामुळे इस्रोचा वाढता भार कमी होणार आहे.
| इस्रो जी.एस.एल.व्ही.रॉकेट |
“भारतातील
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राला एक नवीन विभाग मिळाला आहे. अवकाश तंत्रज्ञान
क्षेत्रात आत्तापर्यंत सरकारचीच मक्तेदारी होती, हे केंद्र सरकाकडूनच
नियंत्रित केलं जात होतं. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती
केली आहे. असं असलं तरी या क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी आता रहाणार नाही. आता
भारतीयांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज आहे, या संघटनेमुळे हुशार व होतकरू संशोधक व अभियांताना संधी मिळणार आहे. मग हे क्षेत्र खाजगी का असेना ” असं सांगत देशातील
अधिकाधिक खाजगी कंपन्यांनी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळण्याचं आवाहन पंतप्रधान
मोदी यांनी केलं आहे.
| ISRO PSLV Rokek System |
भारतीय अवकाश संघटनेमध्ये भारती एअरटेल, लार्सन
अन्ड टुब्रो, नेल्को, वन वेब, मॅपइंडिया, वालचंदनगर
इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्या या संस्थापक सदस्य आहेत. कृत्रिम उपग्रहांचा विविध
क्षेत्रातला वापर हा देशात दिवसें -दिवस वाढत
आहे. विशेषतः इंटरनेटसाठी उपग्रहांचा वापर हा जगाच्या तुलनेत कितीतरी कमी असला तरी
भविष्यात वाढणार आहे. तसंच इस्त्रो आता चंद्र आणि मंगळ ग्रहांबरोबर विविध मोहिमा
हाती घेत आहे. यासाठी देशातील विविध कंपन्याचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लागणार
आहे. या संघटनेच्या मार्फत खाजगी कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग
वाढवला जाणार आहे. यामुळे देशाच्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील गरजा पुर्ण
करण्यासाठी बाहेरील देशांवर अवलंबून न रहाता देशातील कंपन्या या गरजा भविष्यात
पुर्ण करु शकतील अशी अपेक्षा आहे.
| ISRO : Indian Space Research Organization in India |
जगामध्ये
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्याची उलाढाल ३६० अब्ज डॉलर्स
एवढी असून यामध्ये इस्त्रोचा जेमतेम २ टक्के एवढाच वाटा आहे. असं असलं तरी इस्त्रोची
क्षमता लक्षात घेता हा वाटा २०३० पर्यंत ९ टक्के एवढा
सहज गाठला जाऊ शकतो. ज्याचा
फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलाही होणार आहे. म्हणून हे उद्दीष्टय वेगाने आणि सहजरीत्या
गाठण्यासाठी भारतीय अवकाश संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
Monday, July 12, 2021
जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी पाच महत्वाची ठिकाणे
भारतीय उपखंड हा मान्सून हवामानाचा प्रदेश म्हणून जगात परिचित आहे. भारताची शेती मान्सून पावसावर अवलंबून आहे. भारतासह या उपखंडातील देशांमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू असतात, पावसाचे चार महिने सतत कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडत असतो. कधी मुसळधार कोसळतो तर कधी रिमझिम पाऊस येतो. एखाद्या वर्षी ओला दुष्काळही पडतो. परंतु देशभरात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तसेच जगात मुसळधार पाऊस कोठे होतो? हे जाणून घेऊ या.
मसीनराम (मेघालय)
भारताच्या मेघालयातील
मासिनराम हे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. तसेच मसीनराम हे एक हिल स्टेशन असून जिथे
बंगालच्या उपसागरातून येणारे ढग हिमालयातील शिखरे रोखतात आणि हे ढग येथे पाऊस
पडतात. येथे सरासरी वार्षिक पाऊसमान ११,८७१
मिली मीटर आहे.
चेरापुंजी (मेघालय)
चेरापुंजी हे देखील मेघालयातील ठिकाण असून मसिनराम पासून १५ कि.मी. अंतरावर आहे. चेरापुंजी हे जगातील दुसर्या स्थानावर आहे आणि दरवर्षी सुमारे ११,७७७ मिमी पाऊस पडतो. उन्हाळ्याच्या हंगामातही येथील तापमान २३ अंशांपर्यंत जाते आणि पावसाळ्यात येथे मुसळधार सरीमुळे वातावरण थंड होते.
तुटेन्डो
(कोलंबिया)
दक्षिण अमेरिकेत स्थित
कोलंबियाचे तापमान बरेच गरम आहे, परंतु येथे
काही ठिकाणे ही पावसासाठी परिचित आहेत. कोलंबियामधील तुटेन्डो नावाच्या छोट्याशा
ठिकाणी वर्षाकाठी ११,७७० मिमी पाऊस पडतो.
क्रॉप नदी
(न्यूझीलंड)
न्यूझीलंड मधील क्रॉप नदी ९
किलोमीटर लांबीची आहे. या देशात हवामान जरी कोरडे असले तरी क्रॉप नदीच्या
सभोवतालच्या भागात मुसळधार पाऊस पडतो. येथे वर्षाकाठी ११,५१६
मिमी पाऊस पडतो.
सॅन अँटोनियो
(आफ्रिका)
सॅन अँटोनियो डी युरेका हे
आता युरेका व्हिलेज म्हणून ओळखले जातात. हे गाव जगातील सर्वात नामांकित गावच्या
यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. कारण येथे वर्षाकाठी १०,४५० मिमी पाऊस पडतो.
Sunday, December 20, 2020
महाराष्ट्रातील प्रमुख तलाव:
महाराष्ट्राचा भूगोल
स्पर्धा परीक्षाच्या दृस्ठीने अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्या हि प्रकारच्या स्पर्धा
परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलवर तलाव,नद्या,कृषी,पर्यटन,हवामान,उद्योगधंदे व लोकसंख्या
इत्यादी घटकावर प्रश्न हमखास विचारले जातात.म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख तालाव
विषयी माहिती समजून घेणे महत्वाचे आहे.

Dam (तलाव )
महाराष्ट्रातील प्रमुख तलाव (२०२० -२०२१)
|
तलावाचे नाव |
नदी |
तलावाचे ठिकाण |
|
कोयना तलाव |
कोयना नदी |
सातारा |
|
मुळा |
मुळा |
राहुरी (अहमदनगर) |
|
पांचेत |
आंबी |
वेळे जि. पुणे |
|
मुलशी |
मुळा |
मुळशी जि. पुणे. |
|
भंडारदरा |
प्रवरा |
अहमदनगर |
|
वैतरणा |
वैतरणा |
पालघर मुंबई |
|
जायकवाडी |
गोदावरी |
जायकवाडी तालुका पैठण जि.ओरंगाबाद |
|
उजनी |
भिमा |
उजनी, तालुका माढा जि.सोलापूर |
|
पवना |
पवना |
पुणे |
|
गिरणा |
गिरणा |
मालेगाव ( नाशिक) |
|
कोलेवाडी |
वैशिटी |
रत्नागिरी |
|
येलदरी |
पूर्णा |
येलदरी ता. जिंतूर जि.परभणी |
|
राधानगरी |
भगवती |
राधानगरी जि. कोल्हापूर. |
Thursday, December 17, 2020
ISRO चा सी.एम.एस - 01 संचार उपग्रह प्रक्षेपण
भारतीय अवकाश
संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रो पीएसएलव्ही-सी 50 च्या माध्यमातून आज
संप्रेषण उपग्रह सीएमएस -01 लाँच केला . कोरोना युगातील या वर्षी इस्रोची ही
दुसरी मोहीम आहे. यासाठी बुधवारी दुपारी सतीश धवन विशेष केंद्राकडून 25 तासांची काउंटडाउन सुरू झाली होती .
भारतीय अवकाश
संशोधन संस्था (इस्रो) हे पीएसएलव्हीचे 52 वे मिशन आहे . संचार उपग्रह सी.एम.एस - ११ दुपारी 3.४१ वाजता श्रीहरिकोटाच्या
दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. सीएमएस - 01 हा इस्रोचा 42 वा संचार उपग्रह आहे. हे देशातील
मुख्य भूभाग तसेच अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना विस्तारित सी-बँड सेवा
प्रदान करेल. यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी ग्राऊंड मॉनिटरिंग म्हणजे जमानिनीची निगराणी उपग्रह पीएसएलव्ही -सी 49 च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात
आला होता.
संचार उपग्रह सी.एम.एस- 01 ची प्रमुख वैशिट्ये:
१.सी.एम.एस - 01 उपग्रहामुळे दूरसंचार सेवा सुधारतील.
त्याच्या मदतीने टी.व्ही वाहिन्यांची चित्र गुणवत्ता सुधारली जाईल.
2. आपत्ती
व्यवस्थापनादरम्यान सरकारला मदत मिळेल.त्यामुळे प्राणहानी व वित्तहानी कमी होईल.
3. हा उपग्रह २०११ मध्ये प्रक्षेपित केलेल्या जीसॅट - २
टेलिकम्युनिकेशन उपग्रहाची जागा घेईल.
४.सी.एम.एस - 01 पुढील सात वर्षांसाठी सेवा प्रदान करेल.
५.या उपग्रहामुळे अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप
बेटांना विस्तारित सी-बँड सेवा प्रदान करेल त्यामुळे
या बेटावरील हालचाली व सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण केले जाईल.
Wednesday, December 9, 2020
3D डिजिटल एलिवेशन मॉडेल (3D Digital
Elevation Model)
डिजिटल एलिवेशन मॉडेल
भौगोलिक माहिती प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचे तंत्र म्हणून ओळखले जाते. जगामध्ये डिजिटल एलिवेशन
मॉडेलचा वापर विविध प्रकारच्या जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सॉफ्टवेअरमध्ये वापर होतो. डिजिटल एलिवेशन मॉडेल
म्हणजे पृथ्वीच्या भू-भागावरील प्राकृतिक भूरुपांचा उंचवटा व भूरचना याची सखोल माहिती जी.आय.एस. सॉफ्टवेअरमध्ये 3 D मॉडेल निर्मिती
केली जाते व आकर्षक नकाशा 3D स्वरूपात तयार
केला जातो. उदा. पर्वत, पठार,मैदान,नद्या व सरोवर इत्यादी भौगोलिक भूरुपांची
माहिती या मॉडेलच्या मार्फत मिळते.
![]() |
3 D Digital Elevation Model |
डिजिटल एलिवेशन मॉडेल वरूनच भौगोलिक भूरुपांची
उंची, लांबी व क्षेत्रफळ इत्यादी घटकांची
अचूक माहिती मिळते म्हणून भूगोल विषयातील संशोधक, प्राध्यापक व विध्यार्थ्यांसाठी डिजिटल एलिवेशन 3D मॉडेल अत्यंत महत्वाचा आहे. डिजिटल एलिवेशन मॉडेल तयार
करण्यासाठी सर्वप्रथम हवाई उपग्रह प्रतिमा, ड्रोन कॅमेरा वरून घेतलेल्या
प्रतिमा व उपग्रह प्रतिमाचा वापर केला जातो, त्याच बरोबर एस्टर (ASTER) Advanced Spaceborne Thermal Emission Reflection
and Radiometer व SRTM म्हणजे Shuttle
Radar Topography Mission माहिती घ्यावी लागते. ही माहिती भौगोलिक माहिती प्रणाली
सॉफ्टवेअरमध्ये प्रविष्ट करून त्याच्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करता येतो. डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी उपग्रह प्रतिमा महत्वाची आहे.
१.
पृथ्वीवरील प्राकृतिक भूरुपांची वास्तविकता
नकाशावर तयार केली जाते.
२.
पर्वत ,पठार व मैदान इत्यादी भूरुपांची समुद्र
सपाटीपासून उंची योग्य पद्धतीने काढता येते.
३.
विशिष्ठ पर्वतीय प्रदेशातील नद्यांचा प्रवाह व स्वरूप
डिजिटल एलिवेशन
थ्रीडी मॉडेल मार्फत समजते.
![]() |
3D Digital Elevation Model |
डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी म्हत्वाचे जी.आय.एस. software :
डिजिटल
एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी विविध प्रकारचे जी.आय.एस.
software चा वापर केला जातो. उदा, Arc
GIS 108, Global Mapper 21, QGIS 3.10, Grass व
SAGA GIS, इ. जी.आय.एस.
software चा वापर जगामेध्ये आज मोठ्याप्रमाणात केला जातो.
Friday, December 4, 2020
नकाशा प्रक्षेपणाची निवड
प्रक्षेपणाचे विविध प्रकार आहेत परंतु त्यापैकी एकाही प्रक्षेपणात पृथ्वी गोलावरील वृत्तजाळी तंतोतंत किंवा अचूकपणे काढली जात नाही. प्रत्येक प्रक्षेपणात काहीना काही त्रुटी राहूनच जाते. काही प्रक्षेपणात देशाच्या क्षेत्रफळा विषयी काही आकारा विषयी तर काही दिशा संबंधी विकृती (समस्या) निर्माण होत जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की कोणतेही प्रक्षेपण अचूक असत नाही. वेगवेगळे प्रक्षेपणे भिन्नभिन्न उद्देशासाठी काढली जातात. नकाशा प्रक्षेपणाची निवड विशिष्ट उद्देश ठेवून केली तर त्यांच्यापुढे प्रक्षेपण निवडीचे असलेले आव्हान बरेच सोपे होते. त्यांच्यामुळे प्रक्षेपणाची निवड कशी करावी हे अभ्यासणे गरजेचे आहे.
1.
वितरणात्मक नकाशे:
या नकाशात लोकसंख्या घनता, पिकांचे वितरण, नैसर्गिक वनस्पतीचे वितरण इत्यादी दाखवण्यासाठी समक्षेत्र नकाशे उपयुक्त ठरतात त्यांच्यामुळे त्यांचे फक्त वितरणचे दाखवले जात नाही. तर त्यांच्याबरोबर ते जेथे उत्पादित होतात त्या प्रदेशाचा आकारही दाखवला जातो.
2. जगाचा नकाशा:
जगाचा नकाशा काढण्यासाठी दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, मालविडचे प्रक्षेपण व सेनूसायडल प्रक्षेपण इत्यादी प्रक्षेपणाचा उपयोग केला जातो. यापैकी कोणतेही प्रक्षेपण काढण्यास फार अवघड नाही. समक्षेत्र प्रक्षेपण करण्यास अतिशय सोपा आहे तसेच त्यांचे विविध उपयोग असल्यामुळेच जगाचा नकाशा करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. परंतु त्यांच्या ध्रुवाकडील प्रदेशाच्या आकारात विकृती निर्माण होते. या प्रक्षेपणात प्रदेशाचे क्षेत्रफळ व पृथ्वी गोलावरील क्षेत्रफळ योग्य प्रमाणात दाखविले जातात. या प्रक्षेपणातील कर्कवृत्त व मकरवृत्त प्रदेशात फारशी विकृती निर्माण होत नाही. म्हणूनच प्रक्षेपणाचा उपयोग उत्पादनाचे जागतिक वितरण दाखवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ तांदूळ व ऊस यांचे उत्पादन.
3.
मध्य -अक्षवृत्तीय प्रदेशातील पिकांचे वितरण:
मध्य
-अक्षवृत्तीय प्रदेशातील गहू
किंवा मकाया पिकांचा वितरण दाखवायचा असेल तर मालविडचे
प्रक्षेपण व सेनूसायडल प्रक्षेपण इ. प्रक्षेपणाचा उपयोग केला
जातो.
4.
एखाद्या देशाचा किंवा खंडाचा नकाशा:
एखाद्या
देशाचा किंवा खंडाचा नकाशा तयार
करण्यासाठी समक्षेत्र प्रक्षेपणाचा उपयोग केला जातो. त्यासाठी नकाशासंग्रहामध्ये विविध बाबांच्या प्रक्षेपणाचा उपयोग नकाशावर करतात. हे प्रक्षेपण दाखवण्यासाठी फारसे
उपयुक्त नाही. त्यासाठी मालविडचे
प्रक्षेपण व सेनूसायडल प्रक्षेपण इ.
प्रक्षेपणाची योग्य निवड करावी लागेल.
5.
द्वि-प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण:
या प्रक्षेपणाचा उपयोग लहान आकाराच्या
प्रदेशाचा नकाशा करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच त्यांच्यातील विविध
घटकांचे वितरण दाखवण्यासाठी त्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना दाखवण्यासाठी, राजकीय नकाशा तयार
करण्यासाठी केला जातो. उदा, ब्रिटीश प्रदेश, बाल्टिक प्रदेश,फ्रांश व बाल्कन
प्रदेश इ. प्रेदेश दाखविण्यासाठी द्वि-प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण प्रक्षेपणाची निवड करून त्याचा नकाशा तयार
करण्यासाठी उपयोग केला जातो.



