Showing posts with label RS Education. Show all posts
Showing posts with label RS Education. Show all posts

Wednesday, October 13, 2021

भारतीय अवकाश संघटना (Indian Space Association)

 

भारतीय अवकाश संघटना (Indian Space Association) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक ११/१०/२०२१ रोजी भारतीय अवकाश संघटनेची म्हणजेच Indian Space Association ( ISA ) ची स्थापना केली. अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची प्रगती दिवसान दिवस वाढत आहे. दरवर्षी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाण भारतीय अवकाश संशोधन विभागाला निधी दिला जातो.

          Indian Space Association हि संघटना अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या वाढत्या गरज पुर्ण करण्यास ही संघटना मदत करणार आहे. या संघटनेचे नेतृत्व अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोकडे (Indian Space Research Organization) असणार आहे. देशातील वाढता इंटरनेटचा वापर, कृत्रिम उपग्रहांची गरज लक्षात घेता देशातील खाजगी कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सहभाग वाढवणे गरजेचे आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या नियमा अंतर्गत देशातील खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या संघटनेनेमार्फत इस्त्रो करणार आहे. त्यामुळे इस्रोचा वाढता भार कमी होणार आहे.

इस्रो जी.एस.एल.व्ही.रॉकेट

भारतातील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राला एक नवीन विभाग मिळाला आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आत्तापर्यंत सरकारचीच मक्तेदारी होती,  हे केंद्र  सरकाकडूनच नियंत्रित केलं जात होतं. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केली आहे. असं असलं तरी या क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी आता रहाणार नाही. आता भारतीयांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज आहे, या संघटनेमुळे हुशार व होतकरू संशोधक व अभियांताना संधी मिळणार आहे.    मग हे क्षेत्र खाजगी का असेना असं सांगत देशातील अधिकाधिक खाजगी कंपन्यांनी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. 

इस्रो पी.एस.एल.व्ही. रॉकेट
ISRO PSLV Rokek System  

भारतीय अवकाश संघटनेमध्ये भारती एअरटेल, लार्सन अन्ड टुब्रो, नेल्को, वन वेब, मॅपइंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्या या संस्थापक सदस्य आहेत. कृत्रिम उपग्रहांचा विविध क्षेत्रातला वापर हा देशात दिवसें -दिवस वाढत आहे. विशेषतः इंटरनेटसाठी उपग्रहांचा वापर हा जगाच्या तुलनेत कितीतरी कमी असला तरी भविष्यात वाढणार आहे. तसंच इस्त्रो आता चंद्र आणि मंगळ ग्रहांबरोबर विविध मोहिमा हाती घेत आहे. यासाठी देशातील विविध कंपन्याचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लागणार आहे. या संघटनेच्या मार्फत खाजगी कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढवला जाणार आहे. यामुळे देशाच्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील गरजा पुर्ण करण्यासाठी बाहेरील देशांवर अवलंबून न रहाता देशातील कंपन्या या गरजा भविष्यात पुर्ण करु शकतील अशी अपेक्षा आहे.

ISRO
ISRO : Indian Space Research Organization in India

जगामध्ये अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्याची उलाढाल ३६० अब्ज डॉलर्स एवढी असून यामध्ये इस्त्रोचा जेमतेम २ टक्के एवढाच वाटा आहे. असं असलं तरी इस्त्रोची क्षमता लक्षात घेता हा वाटा २०३० पर्यंत ९ टक्के एवढा सहज गाठला जाऊ शकतो. ज्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलाही होणार आहे. म्हणून हे उद्दीष्टय वेगाने आणि सहजरीत्या गाठण्यासाठी भारतीय अवकाश संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

Friday, December 27, 2019

दूर संवेदनाचे प्रकार


प्रस्तावना: दूर संवेदन (रिमोट सेंसिंग), ज्याला पृथ्वीचे निरीक्षक असे म्हणतात.  ओब्जेक्ट किंवा क्षेत्राशी थेट संपर्क न ठेवता पृथ्वीच्या भू- भागावरील वस्तू किंवा क्षेत्राबद्दल अचूक माहिती मिळवण्याचे महत्वाचे कार्य दूरसंवेदन प्रणाली करत आहे. मानवाला भू- भागावरील माहिती उपग्रह मार्फत  मिळते. उपग्रहवरून मिळवलेली माहितीला हवाई छायाचित्र असे म्हणतात. या हवाई छायाचित्र व उपग्रह प्रतिमाच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्या प्रदेशात नैसर्गिक आपत्ती  व सामाजिक बदल झाला आहे याची वास्तविक माहिती मिळते. उदा, भूकंप, पूर, भूमिपात, भूमिउपयोजन इत्यादी घटकाची माहिती मिळते.

दूर संवेदनाचे प्रकार :

विद्युत चुंबकीय उर्जास्रोताच्या उगमस्रोतावर आधारित प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

१)    क्रियाशील दूर- संवेदन:

क्रियाशील दूर संवेदन हा दूर संवेदनाचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. या प्रकारात जे साधने वापरली जातात ती  स्वतः उर्जा निर्मिती करणारे असतात. या स्वयंम निर्मित विद्युतचुंबकीय  उर्जेचा वापर करून ज्या प्रदेशाची उपग्रह प्रतिमा घ्यावयाची आहे त्याकेडे ती उर्जा प्लेटफार्मवरून पाठवली जाते. प्रदेशाकडून किंवा लक्षाकडून ती संवेदकाकडे परावर्तीत होते व संवेदाका मार्फत त्या परवर्तीत उर्जेचे सांकेतिक स्वरुपात रुपांतर करून नोंद घेतली जाते. या प्रक्रिया वरून उपग्रह प्रतिमा तयार केली जाते. उदा , रडारमध्ये स्वयमनिर्मित उर्जा असते. त्यामुळे कोणत्याही प्रदेशाची उपग्रह प्रतिमा काढण्यासाठी उच्चदर्जाचे कॅमेरा च्या साहाय्याने स्वच्छ उच्च दर्जाची  उपग्रह प्रतीमा तयार करण्यासाठी रडारमध्ये स्वयमनिर्मित उर्जा महत्वाची कार्य करिते. त्यामुळे कोणत्याही वेळी म्हणजे दिवसा व रात्रीच्या वेळी उपग्रह प्रतिमा काढल्या जातात.
दूरसंवेदनाचे प्रकार, क्रियाशील दूर संवेदन

क्रियाशील दूर संवेदन


२)    निष्क्रिय दूर-संवेदन :

निष्क्रिय दूर संवेदन म्हणजे ज्यात उर्जेचा स्रोत हा नैसर्गिकरीत्या उपलब्ध असून त्या उर्जेचा वापर करून उपग्रह प्रतिमा घेतली जाते. त्यामुळे सूर्यापासून  उर्जा पृथ्वीवर पोहचते व त्याच वेळी उर्जा वातावरणात परावर्तीत होते हि प्रक्रिया दिवसभर सुरु असते. या नैसर्गिक उर्जामार्फत पृथ्वीवरील भौगोलिक व सामाजिक घटकाची  अचूक माहिती उपग्रह प्रतीमामुळे मिळत असते त्याला निष्क्रिय दूर संवेदन संवेदन असे म्हणतात. निष्क्रिय दूर संवेदन उपग्रहावर साधा कॅमेरा बसवलेला असतो. सूर्य सौर उर्जेच्या मार्फत उपग्रह प्रतिमा काढल्या जातात. हा उपग्रह कॅमेरा फक्त दिवसा प्रतिमा काढत असतो.
दूरसंवेदनाचे प्रकार, निष्क्रिय दूर संवेदन

निष्क्रिय दूर संवेदन



Wednesday, November 20, 2019

काट्रोसेट-3 उपग्रह

काट्रोसेट-3 उपग्रह सोमवारी अवकाशात झेपावणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सोमवारी दिनांक 25/11/2019 रोजी काट्रोसेट-3 उपग्रह सकाळी 9 वाजून 28 मिनीटांनी श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे. अशी माहिती इस्रोने दिली आहे. हा उपग्रह इस्रोच्या पीएसएलव्ही -एक्सएल या प्रक्षेपेकाद्वारे काट्रोसेट -3 उपग्रह श्रीहरिकोटा येथून सन शिंक्रोनस कक्षेत सोडणार आहे. काट्रोसेट -3 हा  पिढीतील सर्वात वेगवान व प्रगत उपग्रह आहे.  हवाई छायाचित्र टिपण्याचे त्याचे तंत्रज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या उपग्रहामुळे भारताच्या सीमेवरील अवकाशातून लक्ष्य ठेवणे मदत होईल.  म्हणून या उपग्रहला   अवकाशातील नेत्र असेही म्हटले जाते.  अवकाशात 509 किलोमीटर दूर व 97.5 अंशावर केलेल्या स्थितीत स्थापन करण्यात येणार आहे.

काट्रोसेट-3 उपग्रह
काट्रोसेट-3 उपग्रह

लष्करासाठी उपग्रह महत्वाचा

यापूर्वी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने 1 एप्रिलला इएमआय सेट व 22 मे 2019 रोजी रिसेट -2 बी या निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. त्यामुळे शत्रूच्या रडारवर नजर ठेवणे हा त्यामागील उद्देश होता. इस्रोतर्फे प्रथमच काट्रोसेट -3 भारतातील सीमा सुरक्षा संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, उदा : भारत- पाकिस्तान सीमावर मोठ्याप्रमाणात आतंकवादी घुसखोरी होत आहे. हि घुसखोरी आटोक्यात आण्यासाठी काट्रोसेट-3 उपग्रह महत्वाचा कार्य करणार आहे.

Monday, November 18, 2019

दूरसंवेदन व्याख्या व दूरसंवेदनाचे भूगोल विषयातील अनुप्रोयाग

प्रस्तावना : पृथ्वीच्या भू- भागावरील विविध प्रकारच्या भौगोलिक व सामाजिक घटकाची माहिती अभ्यास करण्यासाठी दूरसंवेदन तंत्राचा वापर केला जातो. या विविध  घटकाची आकडेवारी व माहिती उपग्रह प्रतीमाद्वारे पृथ्वीवरील केंद्रामध्ये  मिळत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील दूरवरची माहिती विद्युत चुंबकीय लहरी मार्फत उपग्रहावर बसवलेल्या कॅमेराद्वारे व स्कॅनरद्वारे चित्रित केले जाते. हि ,माहिती प्रतिमाच्या स्वरुपात मिळते. उपग्रह प्रतिमाचे वाचन डीजीटल इमेज प्रक्रिया सोफ्टवेअर मार्फत केले जाते.  दूरसंवेदन  भूगोल विषयातील एक महत्वाची नवीन संकल्पना व आधुनिक तंत्र आहे. दूरसंवेदन तंत्राच्या साह्याने पृथ्वीवरील भौगोलिक व सामाजिक घटकाची हवाई छायाचित्र व उपग्रह प्रतिमाच्या साह्याने वर्णन व विश्लेषण केला जातो. हवाई छायाचित्र व उपग्रह प्रतिचा प्रक्रिया विवध उपग्रह प्रतिमा प्रक्रिया सोफ्टवेअर च्या साह्याने  वर्णन ,विश्लेषण व नकाशा तयार केला जातो. लीस -३ उपग्रह प्रतिमाचा  प्रतिमा प्रक्रिया सोफ्टवेअरमध्ये प्रक्रिया करून रंगछटा बदलता येते. त्यामुळे एखाद्या भौगोलिक घटकाचे निरीक्षण अचूक पद्धतीने करिता येते.


व्याख्या: एखाद्या घटकाच्या किवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या संबंधाची  अचूक माहिती मिळवणे , संकलित करणे व त्याचे वर्णन करणे या तंत्राला दूरसंवेदन असे म्हणतात.

लिस:३ उपग्रह प्रतिमा, दूरसंवेदन

लीस :३ उपग्रह प्रतिमा (२०१६)


दूरसंवेदनाचे भूगोल विषयातील अनुप्रोयाग :

) दूरसंवेदणामुळे मानवाला पृथ्वीची माहिती  मिळण्यास मदत होते. त्यामुळे पृथ्वीवरी नैसर्गिक आपत्ती संबधी धोक्याची माहितीचे मुल्यांकन करता येते. 

२) भू-भागावरील नापीक  व सुपीक जमीन उपग्रह प्रमिमाद्वारे अचूक माहिती मिळते  व त्याचे परीक्षण केले जाते.

३) पर्वतीय प्रदेशातील प्राणी व वसस्पती जीवनाचा अभ्यास प्रामुख्याने दूरसंवेदन तंत्राच्या आधारे केला जातो.

४) मानवी वस्त्यांचा आभ्यास केला जातो. त्यांमध्ये ग्रामीण व नागरी  वस्त्यांचे प्रारूप , वस्त्यांची वाढ कोणत्या ठिकाणी जास्त आहे व कोणत्या ठिकाणी कमी आहे याचा सखोल अभ्यास दूरसंवेदन तंत्राच्या आधारे केला जातो.

५) भू- भागावरील नद्या, सरोवर, तलाव व झरे इत्यादी पाण्याचा घटकांच्या अभ्यास साधारपणे दूरसंवेदन अनुप्रोयोगाच्या आधारे केला जातो.

६)भू- भागावरील भूमी उपोयाजनचा अभ्यास योग्य पद्धतीने दूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने केला जातो.

७) पृथ्वीवरील जंगलातील बदल याचा सखोल अभ्यास दूरसंवेदन अनुप्रोयाग तंत्राच्या साह्याने केला जातो.