नकाशाची प्रमुख अंगे
जगातील विविध प्रदेशाचा माहिती जाणून घेण्यासाठी नकाशा वाचनव तंत्र समजणे अत्यावश्यक असते. जगातील विशिष्ठ प्रदेशातील पर्वत, नद्या,सरोवर,झरे, धबधबा,जंगल, मानवी वसाहती,व्यवसाय,वाहतूक व दळणवळण, समाजिक व सांस्कृतिक घटक समजून घेण्यासाठी आधी नकाशात दिशा, आंतर, प्रमाण , सांकेतिक चिन्हे व खुणा बारकाईने आत्मसात करावे लागते. नकाशा तयार करण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रमुख अंगांचा विचार करणे आवश्यक असते.
नकाशा: महाराष्ट्र राज्य |
१) नकाशाचा हेतू:
कोणत्याही प्रदेशाचा नकाशा तयार करतांना त्यामागील हेतू कोणता आहे याचा सर्व प्रथम विचार करून तो नकाशा करावा लागतो. उदा,एखादया प्रदेशाचा लोकसंख्या दाखविण्यासाठी योग्य क्षेत्रफळ दर्शक नकाशा काढणे आवश्यक आहे.
२) नाकाशातील प्रदेश :
नकाशा तयार करतांना तो कोणत्या प्रदेशाचा काढायचा आहे,त्यानुसार इतर घटक म्हणजे भूरचना, प्राकृतिक घटक , सामाजिक व आर्थिक घटकांचा विचार करावा लागतो.त्यामुळे कोणत्या प्रदेशात शेतीचा व्यवसाय अधिक विकाशित झाला आहे व कोणत्या प्रदेशात शेतीचा व्यवसाय विकाशित झाला नाही .याचा सखोल अभ्यास केला जातो.कारण त्या प्रदेशातील सर्व भौगोलिक व सामाजिक घटकांचा सुद्धा बारकाईने अभ्यास करावा लागतो.
३) नकाशा प्रमाण:
नकाशा प्रमाण नकाशा शास्त्रातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. एखाद्या प्रदेशाचा किंवा विशिष्ठ प्रदेशाचा नकाशा तयार करण्यासाठी नकाशा प्रमाण ठरवून नकाशा तयार केला जातो. नकाशा प्रमाणावरून नकाशाची योग्य माहिती मिळते.
४) सांकेतिक चिन्हे व खुणा:
नकाशा काढण्यासाठी सांकेतिक चिन्हे व खुणा नाकाशा शास्त्रातील महत्वाचा अंग आहे. कारण एखाद्या प्रदेशाचा काढण्यासाठी सांकेतिक चिन्हे व खुणा यांच्या आधार घ्यावा लागतो.त्यामुळे नाकाशातील प्राकृतिक व सामाजिक घटक समजण्यास मदत होते.

Nice information
ReplyDeleteअशीच माहिती अपलोड करत राहा सर
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteVery good info
ReplyDeleteThanks
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteNice information about map
ReplyDeleteअशीच माहिती अपलोड करत रहा सर
ReplyDeletegoodinfirmation
ReplyDeleteThank you this information helpful my study 🙏🙏
ReplyDelete