नकाशा प्रक्षेपणाची निवड
प्रक्षेपणाचे विविध प्रकार आहेत परंतु त्यापैकी एकाही प्रक्षेपणात पृथ्वी गोलावरील वृत्तजाळी तंतोतंत किंवा अचूकपणे काढली जात नाही. प्रत्येक प्रक्षेपणात काहीना काही त्रुटी राहूनच जाते. काही प्रक्षेपणात देशाच्या क्षेत्रफळा विषयी काही आकारा विषयी तर काही दिशा संबंधी विकृती (समस्या) निर्माण होत जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की कोणतेही प्रक्षेपण अचूक असत नाही. वेगवेगळे प्रक्षेपणे भिन्नभिन्न उद्देशासाठी काढली जातात. नकाशा प्रक्षेपणाची निवड विशिष्ट उद्देश ठेवून केली तर त्यांच्यापुढे प्रक्षेपण निवडीचे असलेले आव्हान बरेच सोपे होते. त्यांच्यामुळे प्रक्षेपणाची निवड कशी करावी हे अभ्यासणे गरजेचे आहे.
1.
वितरणात्मक नकाशे:
या नकाशात लोकसंख्या घनता, पिकांचे वितरण, नैसर्गिक वनस्पतीचे वितरण इत्यादी दाखवण्यासाठी समक्षेत्र नकाशे उपयुक्त ठरतात त्यांच्यामुळे त्यांचे फक्त वितरणचे दाखवले जात नाही. तर त्यांच्याबरोबर ते जेथे उत्पादित होतात त्या प्रदेशाचा आकारही दाखवला जातो.
2. जगाचा नकाशा:
जगाचा नकाशा काढण्यासाठी दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, मालविडचे प्रक्षेपण व सेनूसायडल प्रक्षेपण इत्यादी प्रक्षेपणाचा उपयोग केला जातो. यापैकी कोणतेही प्रक्षेपण काढण्यास फार अवघड नाही. समक्षेत्र प्रक्षेपण करण्यास अतिशय सोपा आहे तसेच त्यांचे विविध उपयोग असल्यामुळेच जगाचा नकाशा करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. परंतु त्यांच्या ध्रुवाकडील प्रदेशाच्या आकारात विकृती निर्माण होते. या प्रक्षेपणात प्रदेशाचे क्षेत्रफळ व पृथ्वी गोलावरील क्षेत्रफळ योग्य प्रमाणात दाखविले जातात. या प्रक्षेपणातील कर्कवृत्त व मकरवृत्त प्रदेशात फारशी विकृती निर्माण होत नाही. म्हणूनच प्रक्षेपणाचा उपयोग उत्पादनाचे जागतिक वितरण दाखवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ तांदूळ व ऊस यांचे उत्पादन.
3.
मध्य -अक्षवृत्तीय प्रदेशातील पिकांचे वितरण:
मध्य
-अक्षवृत्तीय प्रदेशातील गहू
किंवा मकाया पिकांचा वितरण दाखवायचा असेल तर मालविडचे
प्रक्षेपण व सेनूसायडल प्रक्षेपण इ. प्रक्षेपणाचा उपयोग केला
जातो.
4.
एखाद्या देशाचा किंवा खंडाचा नकाशा:
एखाद्या
देशाचा किंवा खंडाचा नकाशा तयार
करण्यासाठी समक्षेत्र प्रक्षेपणाचा उपयोग केला जातो. त्यासाठी नकाशासंग्रहामध्ये विविध बाबांच्या प्रक्षेपणाचा उपयोग नकाशावर करतात. हे प्रक्षेपण दाखवण्यासाठी फारसे
उपयुक्त नाही. त्यासाठी मालविडचे
प्रक्षेपण व सेनूसायडल प्रक्षेपण इ.
प्रक्षेपणाची योग्य निवड करावी लागेल.
5.
द्वि-प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण:
या प्रक्षेपणाचा उपयोग लहान आकाराच्या
प्रदेशाचा नकाशा करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच त्यांच्यातील विविध
घटकांचे वितरण दाखवण्यासाठी त्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना दाखवण्यासाठी, राजकीय नकाशा तयार
करण्यासाठी केला जातो. उदा, ब्रिटीश प्रदेश, बाल्टिक प्रदेश,फ्रांश व बाल्कन
प्रदेश इ. प्रेदेश दाखविण्यासाठी द्वि-प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण प्रक्षेपणाची निवड करून त्याचा नकाशा तयार
करण्यासाठी उपयोग केला जातो.