मानव व पर्यावरण यांच्या प्राचीन काळापासून जवळचा सबंध आहे. मानवाची प्राथमिक गरजा पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणार अवलंबून आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील नैसर्गिक पर्यावरण निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मानवाने नैसर्गिक व सामाजिक पर्यावरणात राहून विविध प्रकारचे व्यवसाय करून आपले जीवनमान व राहणीमान उंचावले आहे. लोकसंख्या वृद्धी जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे मानवाची मुलभूत गरजा सुद्धा वाढ झाली आहे.मानवाच्या अति महत्व आकांक्षा वाढल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा अतिरिक्त वापर केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.याचा परिणाम भू-भागावरील मानवी जीवनावर झाला आहे.जसे मान्सून पर्जन्याची अनिच्चीतता, जागतिक तापमान वाढणे, नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण इत्यादी प्रकारची परिणाम मानवाला भोगावे लागत आहे.
पर्यावरण हा शब्ध इंग्रजी भाषेतील Environment या शब्दाचा अर्थ आहे.Environ या शब्दाचा अर्थ To Surround म्हणजेच सभोवताली असणे असा असून सभोवतालच्या पर्यावरण असे म्हणतात"
पर्यावरण हा शब्ध इंग्रजी भाषेतील Environment या शब्दाचा अर्थ आहे.Environ या शब्दाचा अर्थ To Surround म्हणजेच सभोवताली असणे असा असून सभोवतालच्या पर्यावरण असे म्हणतात"
- पृथ्वीवरील सभोवतालच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात'
- मानवाच्या सभोवतालच्या प्राकृतिक परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात.
![]() |
नैसर्गिक पर्यावरण :सातपुडा पर्वत नंदुरबार |
पर्यावरणाचे महत्व :
लोकसंख्या जलद गतीने वाढ झाल्यामुळे पृथ्वीच्या भू- भागावरील नैसर्गिक पर्यावरण दिवसन - दिवस कमी होत आहे. मानवाच्या गरजा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरण मानवी जीवनासाठी खूपच महत्वाचे आहे.
१) पर्यावरणातून मानवाला नैसर्गिक साधन संपती मिळते.त्याचा वापर मानव सर्वाधिक वापर करत आहे.
२) पर्वतीय प्रदेशात कंदमुळे, फुले, फळे मानवाला मिळतात असतात. त्यामुळे प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय करतो.
३) वनापासून मानवाला लाकूड, फळे, ऑक्सिजन वायू, औषधी वनस्पती, मिळते. तसेच पिंपळ, वड,उंबर,आपटा या वनस्पती पूजा मानव करत आहे.
४) पर्वतीय प्रदेशात मानव पायऱ्या- पायऱ्या शेती करतो. त्यात भात शेती, मसाल्याचे पदार्थ, बटाटे इत्यादी प्रकरचे पिकांची उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
५) पृथ्वी वरील सजीव घटक , कीटक प्राणी, पक्षी इत्यादी नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे.
Nice sirji 👍👌👏👏👏
ReplyDelete