सर्वेक्षण तंत्र भूगोल विषयातील अत्यंत महत्वाचे साधन आहे. या तंत्राचा प्राचीन काळापासून तर आधुनिक युगा पर्यत सर्वाधिक वापर केला जातो. प्राचीनकाळी मानवाला एखाद्या प्रदेशाचे विशिष्ठ भू- भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी खूपच कालावधी लागायचा व अचून सर्वेक्षण होईल याची खात्री नव्हती. परंतु कालांतराने विज्ञान तंत्रन्यानाचा विकास झाल्यामुळे सर्वेक्षण तंत्रात व साधनात बदल झाला.त्यामुळे नवीन तंत्रण्यानामुळे मानवाला शेती किंवा इतर भू- भागाची मोजणी करण्यसाठी कमी कालावधीत योग्य पद्धतीने सर्वेक्षण केले जाते. सध्या लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे व नैसर्गिक साधन संपत्ती कमी होत आहे. त्यामुळे मानवाला आज विविध प्रकारचा व्यवसाय व शेती करण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. शहरी भागात नागरीकरण जलद गतीने वाढत आहे. ग्रामीण व शहरी भागातील भू- भागाची मोजणी करण्यासाठी सर्वेक्षण तंत्राला लोकांची मागणी वाढली आहे.
| सर्वेक्षण यंत्र |
सर्वेक्षण म्हणजे काय ?
" पृथ्वीवरील विवध भू-आकाराचे, भू-प्रदेशाचे मापन , मोजमाप आणि आराखडे, नकाशे या द्वारे त्याचे केलेले रेखाटन या वैज्ञानिक प्रक्रियेस सर्वेक्षण असे म्हणतात".भूगोल विषयातील सर्वेक्षण महत्वाचे तंत्र आहे. रस्ते,कालवे,रेल्वे याचे मार्ग ठरविणे, धरणे व शेती यांच्या जागा ठरविणे अशा अनेक घटकासाठी सर्वेक्षण करणे अतिशय महत्वाचे असते.
१) भू- भागावरील जमीन मोजण्यासाठी सर्वेक्षण तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनेचे योग्य माहिती मानवाला मिळते.
२) नवीन रस्ते, रेल्वेमार्ग तयार करण्याआधी भू -भागावरील चढ-उतार जमिनेचे योग्य प्रकारे सर्वेक्षण केले जाते.
३) नद्यांचे पात्र व लांबी मोजण्यासाठी सर्वेक्षण तंत्राचा वापर सर्वाधिक केला जातो.
४) शहरी भागातील घर मोजण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो.
५) शासकीय विभाग व महाविधालाय कॅम्पस मोजण्यासाठी सर्वेक्षण तंत्राचा उपयोग केला जातो. यामुळे सदर विभागातील किती क्षेत्र व्यापलेले आहे हे समजण्यास मदत होते.

खूपच छान
ReplyDeleteअशीच माहिती अपलोड करत रहा सर
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteThanks
ReplyDelete