पृथ्वीगोल म्हणजे "पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय". पृथाविगोल हा त्रिमितीय आहे.तसेच विशिष्ठ प्रमाणावर काढल्यास पृथ्वीवरील अनेक
घटकाची निश्चित माहिती देऊ शकतो. पृथ्वी गोलावर अक्षवृते व रेखावृते याची वृतजाळी
तयार करता येते. त्यामुळे पृथ्वी वरील कोणत्याही प्रदेशाचे क्षेत्रफळ,दोन ठिकाणामधील
अंतर आणि दिशा याची योग्य माहिती मिळू शकते.पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश,विषुववृत्तीय प्रदेश,त्याचप्रमाणे भूमिखंडे व महासागर यांच्यात आकारासंबंधी आकलन करता येते. पृथ्वीगोल भूगोल शास्त्राच्या अभ्यासात अधिक महत्व असले तरी प्रत्येक वेळी व प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग करता येणे शक्य होत नाही. कारण पृथ्वीगोल काही विशिष्ठ प्रमाणावर तयार केलेले असतात.ते सर्वच ठिकाणी सहजपणे बरोबर किंवा सोबत बाळगणे शक्य नाही.हे सर्व घटक लक्षात घेऊन पृथ्वीगोल काढणे शक्य नाही.
 |
पृथ्वी गोल
|
नकाशा ( Map)
नकाशा हा द्विमितीय असून त्यावरुन आपणास कोणताही प्रदेशाची लांबी व रुंदी समजते .परंतु जर त्यामध्ये उठाव दर्शवणाऱ्या पद्धतीचा वापर केला तर उंची व खोली यांची सुद्धा सापेक्ष कल्पना येते.तरी सुद्धा पृथ्वी गोला इतकी क्षेत्रफळ,अंतर व दिशा याची अचूक कल्पना करता येत नाही.परंतु नकाशा हा विवध हेतू लक्षात घेऊन काही विशिष्ठ प्रदेशासाठी तयार करिता येऊ शकतो. त्याचप्रमाणे नकाशे हे कुठेही सहजपणे सोबत बाळगता येतात.त्यामुळे नकाशाचे महत्व दिवसन दिवस वाढत आहे.
"नकाशा म्हणजे संपूर्ण देशाचा किंवा जगाचा तसेच एखाद्या विशिष्ठ प्रदेशाचा प्रमाण,प्रक्षेपण,सांकेतिक चिन्हे व खुणा यांच्या साहाय्याने सपाट पृष्ठभागावर तयार केलेली आकृती होय"
 |
राजकीय नकाशा : महाराष्ट्र राज्य
|
Nice information about maps
ReplyDeleteIt is very easy and simple
ReplyDeleteExllent information sir
ReplyDelete