Sunday, November 17, 2019

भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस) व महत्व



भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस) स्थानिक किंवा भौगोलिक डेटा कॅप्चर स्टोअर, हाताळणी विश्लेषण, व्यवस्थापन आणि सादर करण्यासाठी  डीजाइन केलेली एक  प्रणाली आहे.जी.आय.एस. अपलीकेशन्स अशी साधने आहेत की एखाद्या प्रदेशाची किंवा स्थानिक माहितीचे विश्लेषण करण्यसाठी, नकाशामध्ये  डेटा संपादित करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. भौगीलिक माहिती प्रणाली द्वारा विविध शहरे व प्रादेशिक नियोजन कार्यासाठी समर्थन देण्यासाठी वापरली जाणारी मौल्यवान साधने बनली आहे. 

जी.आय.एस .म्हणजेच भूगोलिक माहिती प्रणाली होय. या संज्ञेला इंग्रजीत Geographical Information System ( G.I.S) असेही म्हणतात.हे तंत्रज्ञान १९६१  सालापासून जगभरात मोठ्याप्रमाणात उपयोग केला जात आहे."पृथ्वीवरील विविध ठिकाणच्या माहितीच्या वर्णन करणाऱ्या , सांखिकीय साठवण करणारी व त्या सांखीकीचे उपयोग करणारी प्रणाली म्हणजे भौगोलिक  माहिती प्रणाली होय."


Geographical information system and  GIS Important
Degital Elevation Model Map of Satpura Mountain Ragion in Nandurbar District


जी.आय.एस. अपलीकेशन्सचे महत्व : 

भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस.) अप्लीकेशन जगामध्ये विविध क्षेत्रात कार्य करीत आहे. भू-भागावरील भौगोलिक घटकाचे विश्लेषण अचूक पद्धतीने करून नकाशा तयार करणे या प्रणालीचा मुख्य हेतू आहे.

१) विवध प्रकारचे नकाशे बनविणे :
 जी.आय.एस.) अप्लीकेशनच्या साह्याने गुगल मेप, बिंग मेप, याहू मेपचा  वापर करून रस्तेमार्ग, रेल्वे मार्ग , जलमार्ग, नद्या, तलाव , वसाहती , दवाखाने , शाळा , जंगल, शेतीतील विवध पिके इत्यादी प्रकारचे नकाशे योग्य पद्धतीने तयार केले जातात.

२) टेलीकाम व नेटवर्किंग : 
भौगीलिक माहिती प्रणालीचा वापर टेलीकाम व नेटवर्किंग क्षेत्रात  महत्वाची भूमिका बजावते. टेलीकाम उद्योगासाठी नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी एक उत्तम साधन आहे.

३) शहर नियोजन:
  शहर नियोजनासाठी भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. शहराची रचना चांगल्या पद्धतीने कशी करिता येईल यासाठी भू-भागावरील प्राकृतिक रचनाचा सखोल अभ्यास केला जातो. एखाद्या शहराची वाढ कोणत्या दिशने होत आहे याचा अचूक नकाशा तयार केला जातो.

४) वाहतुकीचे नियोजन: 
जी.आय.एस प्रणालीचा उपयोग साधारणपणे परिवहन, रेल्वे मार्ग आखणीसाठी केला जातो. नवीन रेल्वेमार्ग , रस्ते मार्ग तयार करण्यासाठी विविध प्रकारची योजना आखून मानवी समुदाय व नैसर्गिक पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल या उद्देशाने नियाजन व व्यवस्थापन केले जाते.
५) कृषी क्षेत्रात जी.आय. अपलीकेशन्सचे वापर करणे: 
अधिक प्रभावी व कार्यक्षम शेती तंत्र तयार करण्यासाठी जी.आय.प्रणालीचा वापर करिता येईल. माती , पाणी , पिकांची मशागत, पिकावरील रोग , हवामान, तापमान इत्यादी घटकाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी जी.आय.एस तंत्र प्रभावी होईल. त्यामुळे शेतीतील विविध पिकांची उत्पादन क्षमतेत वाढ होईल.

६) भूमी उपोयाजन क्षेत्रात जी.आय.एस.प्रणालीचा वापर करणे: 
पृथ्वीच्या भू-भागावरील जमीनीचा क्षेत्र पिकाखालील किती आहे, पडीत जमीन, शेतीयोग्य जमीन , जंगल , पाण्याचा स्रोत,मानवी वसाहती इत्यादी घटकाची योग्य माहिती मिळते. भूमी उपयोजनात किती वाढ झाली आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी जी.आय.एस.तंत्राचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो.
     पर्वतीय क्षेत्रातील भूमिपात,आपत्ती व्यवस्थापन , भू-भागावरील नैसर्गिक साधन संपत्ती, जी.आय.एस.प्रणालीचा वापर केला जातो.  

5 comments:

  1. खूप छान माहिती आहे सर (निसर्गरौम्य)

    ReplyDelete
  2. व्हा छान माहीत ती पण मराठीत छान 🙏🏼👍👍

    ReplyDelete