Showing posts with label GIS Education. Show all posts
Showing posts with label GIS Education. Show all posts

Wednesday, December 9, 2020

3D Digital Elevation Model in QGIS 3.10

3D डिजिटल एलिवेशन मॉडेल (3D Digital Elevation Model)

डिजिटल एलिवेशन मॉडेल भौगोलिक माहिती प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचे  तंत्र म्हणून ओळखले जाते. जगामध्ये डिजिटल एलिवेशन मॉडेलचा वापर विविध प्रकारच्या जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सॉफ्टवेअरमध्ये वापर होतो. डिजिटल एलिवेशन मॉडेल म्हणजे पृथ्वीच्या भू-भागावरील प्राकृतिक भूरुपांचा उंचवटा भूरचना याची सखोल माहिती जी.आय.एस. सॉफ्टवेअरमध्ये 3 D मॉडेल निर्मिती केली जाते व आकर्षक  नकाशा 3D स्वरूपात तयार केला जातो. उदा. पर्वत, पठार,मैदान,नद्या सरोवर इत्यादी भौगोलिक भूरुपांची  माहिती या मॉडेलच्या मार्फत मिळते.

3 D Digital Elevation Model

3 D Digital Elevation Model 



 डिजिटल एलिवेशन मॉडेल वरूनच भौगोलिक भूरुपांची उंची, लांबी क्षेत्रफळ इत्यादी घटकांची  अचूक माहिती मिळते म्हणून भूगोल विषयातील संशोधक, प्राध्यापक  विध्यार्थ्यांसाठी  डिजिटल एलिवेशन 3D मॉडेल अत्यंत महत्वाचा आहे. डिजिटल एलिवेशन मॉडेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम हवाई उपग्रह प्रतिमा, ड्रोन कॅमेरा वरून घेतलेल्या प्रतिमा उपग्रह प्रतिमाचा वापर केला जातो,  त्याच बरोबर एस्टर (ASTER) Advanced Spaceborne Thermal Emission Reflection and Radiometer SRTM म्हणजे Shuttle Radar Topography Mission   माहिती घ्यावी लागते.  ही माहिती भौगोलिक माहिती प्रणाली सॉफ्टवेअरमध्ये प्रविष्ट करून त्याच्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून  डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करता येतो. डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी उपग्रह प्रतिमा  महत्वाची आहे.

१.      पृथ्वीवरील प्राकृतिक भूरुपांची वास्तविकता नकाशावर तयार केली जाते.

२.      पर्वत ,पठार व मैदान इत्यादी भूरुपांची समुद्र सपाटीपासून उंची योग्य पद्धतीने काढता येते.

३.      विशिष्ठ पर्वतीय प्रदेशातील नद्यांचा प्रवाह व स्वरूप डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल मार्फत समजते.

3D Digital Elevation Model 



डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी म्हत्वाचे  जी.आय.एस. software :

डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी विविध प्रकारचे जी.आय.एस. software चा वापर केला जातो. उदा, Arc GIS 108, Global Mapper 21, QGIS 3.10, Grass  SAGA GIS, इ. जी.आय.एस. software चा वापर जगामेध्ये आज मोठ्याप्रमाणात केला जातो.

Sunday, December 22, 2019

भौगोलिक माहिती प्रणालीतील डिजिटल एलिव्हेशन मॉडेल


डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) हे भौगोलिक माहिती प्रणालीमधील एक अत्यंत महत्वाचे मॉडेल आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील उंचवटा किंवा चढ-उतार भौगोलिक प्रदेशाचे  अचूक माहितीचे प्रतिनिधींतत्व  डिजिटल एलिव्हेशन मॉडेल   मार्फत होते.   कोणत्याही डिजिटलचा संदर्भ घेण्यासाठी डिजिटल एलिव्हेशन मॉडेलचा वापर वारंवार केला जातो. भूप्रदेशातील विशेषता  स्वरूप निश्चित करण्यासाठी भौगीलिक  माहिती प्रणालीतील या टूलचा वापर केला जातो.  एखाद्या प्रदेशातील नदीचे  खोरे, पर्वतीय प्रदेश, सरोवर, तलाव, इत्यादी  भूप्रदेशातील वैशिष्ट्ये डीईएम मार्फत नेटवर्क ओळखता येतात. डीइएम तंत्र नदीचे खोरे व त्यातील नैसर्गिक पर्यावरणीय घटक अभ्यास करण्यासाठी सर्वाधिक वापर केला जातो.

Digital Elevation Model

डीईएम म्हणजे काय :

डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) एक विशिष्ट प्रकारचा डेटाबेस आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील  जमिनीचे सर्वेक्षण व डीईएम उपग्रह प्रतीमा  डेटा कॅप्चर करून त्याचे भौगोलिक माहिती प्रणाली सोफ्टवेअर मार्फत विश्लेषण करून एक विशिष्ठ प्रकारचा नकाशा तयार केला जातो त्यास  डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) असे म्हणतात.


डीईएम नकाशा तयार करण्यासाठी जी.आय.एस सॉफ्टवेअर:

१.    सागा जी.आय.एस. (SAGA GIS)  सोफ्टवेअर सर्वात प्रभावी डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) उपग्रह प्रतिमाचे विश्लेषण करणारे टूल्स आहे. हे सोफ्टवेअर मोफत वापरत येते.

 .   क्यू. जी.आय.एस. या ओपेन सौर्स सोफ्टवेअरमध्ये डिजिटल एलिव्हेशन मॉडेल नकाशा मोफत तयार करता येते. Q.GIS 3.10 Version सर्वात प्रभावी  सोफ्टवेअर आहे.

 .  ग्लोबल मेपर जी.आय.एस सोफ्टवेअरमध्ये आकर्षक डिजिटल एलिव्हेशन मॉडेल नकाशा तयार केला जातो. परतू हे  सोफ्टवेअर मोफत वापरता येत नाही. ग्लोबल मेपर २१ आवृत्ती ४० हजार रुपये पर्यत किमत आहे.

4.आर्क जी.आय.एस सोफ्टवेअरमध्ये सुद्धा डिजिटल एलिव्हेशन मॉडेल नकाशा तयार केला जातो.या सोफ्टवेअरचा जगात सर्वात वापर केला जातो.  या  सोफ्टवेअरमध्ये  लायसन्स वर्सजन असल्यामुळे मोफत वापरता येत नाही. हे सोफ्टवेअर विकत घ्यावे लागते.

Sunday, December 15, 2019

GPS Survey Mobile Application मोफत वापरा व शिका

 भू- भागावरील जमिनीचे मोजमाप करण्यासाठी  GPS सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्राच्या आधारावर पृथ्वीवरील भौगोलिक घटकाची योग्य माहिती मिळवता येते.  GPS सर्वेक्षणाचे महत्व दिवसान दिवस वाढत आहे. GPS INSTRUMENT आज बाजारात १५००० ते ६०,०००  रुपया पर्यत उपलब्ध आहे.GARMIN GPS INSTRUMENT सर्वेक्षण करण्यासाठी जगात मोठ्याप्रमाणात वापरले जाते.

GPS Survey Application

Mobile Totographer GIS Application 



GPS सर्वेक्षण Android Mobile Application द्वारा  अचूक पद्धतीने जमिनीचे मोजमाप केले जाते. Mobile Topographer GIS , Android Mobile Application GPS सर्वेक्षण करण्यासाठी प्रभावी Application आहे. हे Application  Free वापरता येते. भू- भागावरील कोणत्याही ठिकाणी सर्वेक्षण करता येते. हे Application Google Play Store मध्ये जा Download करता येते. Topographer Application , Android Mobile  GPS सर्वेक्षण Application मध्ये WGS 86 coordinate System दिल्यामुळे  GPS Survey Accuracy खुपाच चांगली आहे.Topographer GIS Application मध्ये Accuracy 0-6 Miter सहज मिळते. हे Application S.F. Applicability Ltd. Company ने तयार केले आहे.



GIS Survey Mobile ApplicationGPS survey






































GPS Mobile Application

Mobile Topographer Satellite 


Mobile Topographer GIS मधील महत्त्वाचे Tool Bar : 


१) Google Map feature दिल्यामुळे GPS सर्वेक्षण अधिक प्रभावी होते व नकाशा उठावदार दिसतो.

२) Point Map tool bar दिल्यामुळे  GPS सर्वेक्षण  करतांना मदत होते,त्यामुळे भू- भागावरील सर्वेक्षण point सहज लक्षात येते.

३) Satellite शी जोडल्यामुळे जगातील विवध Satellite Active आहे की नाही हे समजते.

४) Point , Polygon या टूलच्या साहाय्याने GPS सर्वेक्षण करिता येते. तसेच Area Calculation सुद्धा अचूक पद्धतीने करिता येते.

५) txt, csv, kml, gpx, dxf file Export करता येते.त्यामुळे GPS सर्वेक्षण केल्यानंतर file विवध प्रकारचा format EXPORT केली जाते.

महत्व :
 Mobile Topographer GIS एक महिन्यासाठी मोफत वापरता येते. त्यामुळे विधार्थी व संशोधकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. प्रगत व हुशार शेतकरी जमीन मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. GPS Survey केल्यानंतर योग्य दिशा समजते.

Saturday, December 7, 2019

QGIS 3.10 Software Tool Bar मराठीत शिका

प्रस्तावना : QGIS 3.10 Software मध्ये विविध प्रकारच्या टूल बारचा  उपयोग विविध प्रकारच्या नकाशे बनविण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.  QGIS 3.10 GIS Software  मध्ये टूल  बारची  बारकाईने माहिती समजणे महत्त्वाचे आहे.

QGIS 3.10 Tool Bar Marathi

QGIS :3.10 Tool Bar 


1)    New Project :     

 QGIS 3.10 Software open केल्यानंतर  ज्या प्रकारच्या नकाशा  बनवायचा असेल तर त्या नकाशाचे  नवीन प्रोजेक्ट बनविणे आवश्यक असते. उदा, रस्तेमार्ग , रेल्वेमार्ग , भूमी उपोयाजन व लोकसंख्या वितरण, घनता इत्यादी प्रकारचा नकाशा बनविण्यासाठी प्रत्येक नकाशाचा नाविन प्रोजेक्ट बनवावा लागतो. 

2) Open Project :


एख्याद्या वेळी परत त्याच प्रकारचा जर नकाशा बनवायचा असेल तर आपण बनविलेला नकाशा प्रोजेक्ट ओपेन करून कमी वेळात नकाशाबनविता येतो.म्हणून ओपेन प्रोजेक्ट वापर QGIS 3.10 Software     वापर केला जातो.

3) Save Project :


आपण बनविलेला  किंवा बनविलेला प्रोजेक्ट कायमस्वरूपी QGIS Software Save करण्यासाठी  Save Project  टूलबारचा उपयोग केल केला जातो.

4) New Print Layout : 


या टूलबारचा उपयोग साधारणपणे आपण बनविलेल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये  नकाशा designed करण्यासाठी केला जातो.QGIS 3.10 software  मधील सर्वात महत्त्वाचे टूलबारआहे.या टूलबारमध्ये  उत्तर दिशा, नकाशा प्रमाण , शुची,  सांकेतिक चिन्अहे व खुणा अक्षवृत्त ,रेखावृत्त  तयार केले जातात.


5) Show Layout Manager : 


आपण बनविलेला नकाशा पुन्हा बघण्यासाठी Show Layout Manager
वर क्लीक केल्यानंतर आपण सेव केलेला नकाशा पुन्हा पुन्हा बघता येतो. म्हणन या टूल बारचा वापर QGIS User  मोठ्या प्रमाणात करतात.

 6) Style Manager : 

 एखाद्या प्रकारचा नकाशा बनविल्या नंतर त्या नकाशाला विविध प्रकारचे  Style ध्यावी लागते. नकाशा उठावदार दिसावा म्हणून Style Manager  क्लिक करून विविध प्रकारची Style दिली जाते.


QGIS 3.10 Style Manager Tool Bar Marathi

QGIS 3.10 Style Manager Tool



7) Pan Map  :

 QGIS 3.10 Software मध्ये आपण तयार केलेला नकाशा Pan Map टूल बार क्लिक करून कोणत्याही प्रकारचा नकाशा सरकवता येतो म्हणजेच Move करता येते.
             

 8) Pan Map to Selection : 

QGIS 3.10 Software मध्ये नकाशा open करा Pan Map to Selection टूलबारवर  क्लिक केल्यानंतर  नकाशा सरकवता येतो. सहसा या टूल बारचा जास्त वापर केला जात नाही.

9)  Zoom In : 

नकाशा मोठा करण्यासाठी या टूल बारचा वापर केला जातो. नकाशातील एखादा लहान भागाची निरीक्षण किंवा सविस्तर पाहण्यसाठी Zoom in Tool चा वापर QGIS User वापर करतात.


10) Zoom Out : 

 नकाशा मोठा केलेला असेल आणि लहान किंवा योग्य आकार करण्यासाठी Zoom Out  टूल बारचा वापर  प्केरामुख्लायाने केला जातो.


  11) Zoom Full : 

एका क्लिकवर  नकाशा लहान किंवा मोठा केला जातो. कमी वेळात नकाशा लहान व मोठा केला जातो.


 12)  Zoom to Selection : 

या टूलबारवर क्लिक केल्यानंतर नकाशा एख्याद्या भागावर क्लिक करा तो भाग एका क्लिक वर मोठा किवा लहान होईल.











   
















Monday, December 2, 2019

QGIS 3.10 Open Source Software मोफत वापरा

Q.G.I.S  हे भौगोलिक माहिती प्रणालीतील सर्वात महत्त्वाचे Open Source Software आहे.  सर्वप्रथम  गेरी शर्मनन 2002 मध्ये Q.G.I.S प्रोजेक्टला सुरवात केली. Q.G.I.S ला  Quantum Geographical Information System असेही  म्हणतात. त्यानंतर 2007 मध्ये Open Source Geo-spatial Foundation चा इनक्यूबेटर प्रकल्प  तयार करण्यात आला. Quantum GIS 1.0 पहिली आवृत्ती   जानेवारी 2009 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. हे सोफ्टवेअर 2012 मध्ये 48 भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले.  त्यामुळे Quantum G.I.S Software जगामध्ये जलद गतीने विकास झाला. जागतिक पातळीवर  विविध कॅम्पण्यानी समर्थन केले. Quantum G.I.S Software चा वापर शैक्षणिक संस्था व औद्योगिक संस्था वेगवेगळ्या  प्रकल्पासाठी वापर करतात. QGIS Software 2017 पासून मेक ओएस,लिनक्स,युनिक्स व मायक्रोसोफ्ट ओपरेटिंग सिस्टममध्ये  उपलब्ध आहे. QGIS Software फ्री मध्ये Download करून वापरू शकतात.या software मध्ये Victor व Raster डाटाची प्रक्रिया केली जाते.

QGIS 3.10 free Version

QGIS:3.10 



QGIS Software मध्ये कोण-कोणते नकाशे बनवता येतात


QGIS 3.10 नवीन आवृत्ती 2019 मध्ये विकशित करण्यात आली असून आधुनिक पद्धतीने विविध प्रकारचे नकाशे बनविले जातात.

1) Location Map
2)  Choropeth Map
3) Isopeth Map
4) Rainfall Map
5)Line and Bar graph Map
6) Pie Chart Map
7) River Map
8) Soil Map
9) Road and Network Map
10) Land use and Land Cover Map
11) Slope Map
12) DEM  Map
13 Supervised Classification Map
14) Unsupervised Classification Map
15) NDVI Classification Map
QGIS Open source Software of Nandurbar District
QGIS 3.10 Satellite Map of Nandurbar District


QGIS introducation
QGIS 3.10 Road and Network Map of Nandurbar District

QGIS Software कसे Download करणार ?

QGIS Software Download करण्यासाठी  Google सर्च इंजिनमध्ये   www.QGIS.org type करून search करून Download करता येईल . QGIS Software Download व Install करतांना काही समस्या आली तर comment करा नक्कीच माझ्याकडून मदत केली जाईल.