Friday, November 29, 2019

सर्वेक्षणाचे प्रकार

जमिनची  मोजमाप किंवा नकाशा तयार करण्यासाठी सर्वेक्षण अत्यंत महत्वाचा घटक आहे. सर्वेक्षणाला  मोजणीशास्त्र असेही म्हणतात. कारण प्राचीन काळापासून तर आजपर्यंत प्रगत असलेले तंत्र आहे.  जमिनची योग्य पद्धतीने मोजमाप करून आराखडा तयार केला जातो.  सर्वेक्षणाचे प्रमुखाने दोन प्रकार आहेत.

१) समतल सर्वेक्षण: (Plane Surveying)

पृथ्वीच्या सपाट भू- भागावर किंवा मैदानी भागावर  विशिष्ठ भागाची मोजणी केली जाते त्याला समतल फलक सर्वेक्षण असे म्हणतात. हे सर्वेक्षण एखाद्या लहान भू- भागाची अचूक मोजणी करण्यासाठी सर्वाधिक वापर केला जातो. बु-भागाचा वाक्रपणा दर किलोमीटर ५.४ सेमी, इतका असतो. त्यामुळे लहान आकाराच्या भूभागाचे सर्वेक्षण करून या प्रकारचे नकाशे तयार केले जातात. या सर्वेक्षणाचा प्रकारात भूभागाचा वक्राकार भाग विचारात घेतला जात नाही. 
Plane Surveing

समतल सर्वेक्षण: (Plane Surveing)



२) धरागोल किंवा त्रिकोणमिती सर्वेक्षण : ( Geodetic or Trinometric Surveying)
 

या  सर्वेक्षण प्रकारात भू -भागाचा वक्राकारपणा लक्षात घेतले जाते.जेव्हा मोठ्या आकाराच्या भूगागाच्या सर्वेक्षण करण्यासाठी धरागोल किंवा त्रिकोणमिती सर्वेक्षणाचा  उपयोग केला जातो. भू-भागावरील  सर्वेक्षण रेषा वक्र समजण्यात येते.तसेच या वक्ररेषामध्ये तयार होणारे कोन गोलीय कोण (Spherical Angle) मानले जातात.या  सर्वेक्षणातील त्रिकोण गोलीय त्रिकोण (Spherical Traingle)  समजले जातात. त्यामुळे या सर्वेक्षणात बिनचूकपणा सर्वात जास्त आहे. या सर्वेक्षणात आधुनिक तंत्राच्या आधारावर सर्वेक्षण केले जाते.
 types of servey in Marathi

धरागोल किंवा त्रिकोणमिती सर्वेक्षण : ( Geodetic or Trinometric Surveying)



8 comments: