Thursday, December 26, 2019

तळोदा महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा



कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा येथे दिनांक २२/१२/२०१९ रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला.  महाविद्यालायाचे प्राचार्य पी.व्ही.रामैया यांनी भारताचे प्रसिद्ध गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विध्यार्थ्यानी गणित तज्ञ रामानुज प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण गणित विभागातील प्रा. स्वप्नील वाणी यांनी गणित विषयाचे महत्व व विध्यार्थानी गणित विषयात आवड निर्माण करावी असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. एच.डी.सावंत यांनी  श्रीनिवास रामानुजन जीवनातील तत्त्वज्ञान व वैदिक गणित या संदर्भात  विध्यार्थ्याना अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच प्रा.डॉ. एस.आर.गोसावी सिनेट सदस्य क.ब.च.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, यांनी महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी विषयाकडे कल वाढवावे व आवड निर्माण करून शिकले तर नक्कीच भविष्यात फायदा होईल असे आपल्या भाषणात नमूद केले.
राष्ट्रीय गणित दिवस, तळोदा महाविद्यालय

प्रा. स्वप्नील वाणी प्रास्ताविक करतांना

राष्ट्रीय गणित दिवस, श्रीनिवास रामानुजन गणित दिवस

श्रीनिवास रामानुजन प्रतिमा पूजन


गणित दिवसानिमित पोस्टर प्रदर्शन
वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील  विध्यार्थ्यानी श्रीनिवास रामानुजन जीवन चरित्र, रामानुजन सम, गणित विषयातील विविध सूत्रे, सिद्धांत इत्यादी संदर्भात पोस्टर प्रदर्शन केले. या पोस्टर प्रदर्शन कम्पिटीसन स्पर्धेत एकूण ६  विद्यार्थी सहभागी झाले. प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणारा विध्यार्थ्याना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय गणित दिवस तळोदा

पोस्टर प्रदर्शन तळोदा महाविद्यालय


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी.व्ही.रामैया यांनी विज्ञान शाखेतील विध्यार्थ्यानी गणित विषयातील जास्तीत जास्त गोडी निर्माण करावी व गणित विषय चांगला समजून घेतला तर नक्कीच खूपच सोपा आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. या कार्यक्रमात वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस.एन.शर्मा (हिंदी विभाग),प्रा.जे.एन.शिंदे प्रा.डॉ.पी.आर.बोबडे, कमलेश बेडसे, जे.के.पिंपरे,एम.ए.वसावे, जी.एम.मोरे, आर.एल.राजांनी,महेंद्र माळी, आर.डी.मोरे. यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यालयीन अधीक्षक योगेश्वर पंजराळे, मनिष कलाल, राजू हिवरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.



1 comment: