Showing posts with label Notice. Show all posts
Showing posts with label Notice. Show all posts

Thursday, December 26, 2019

तळोदा महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा



कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा येथे दिनांक २२/१२/२०१९ रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला.  महाविद्यालायाचे प्राचार्य पी.व्ही.रामैया यांनी भारताचे प्रसिद्ध गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विध्यार्थ्यानी गणित तज्ञ रामानुज प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण गणित विभागातील प्रा. स्वप्नील वाणी यांनी गणित विषयाचे महत्व व विध्यार्थानी गणित विषयात आवड निर्माण करावी असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. एच.डी.सावंत यांनी  श्रीनिवास रामानुजन जीवनातील तत्त्वज्ञान व वैदिक गणित या संदर्भात  विध्यार्थ्याना अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच प्रा.डॉ. एस.आर.गोसावी सिनेट सदस्य क.ब.च.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, यांनी महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी विषयाकडे कल वाढवावे व आवड निर्माण करून शिकले तर नक्कीच भविष्यात फायदा होईल असे आपल्या भाषणात नमूद केले.
राष्ट्रीय गणित दिवस, तळोदा महाविद्यालय

प्रा. स्वप्नील वाणी प्रास्ताविक करतांना

राष्ट्रीय गणित दिवस, श्रीनिवास रामानुजन गणित दिवस

श्रीनिवास रामानुजन प्रतिमा पूजन


गणित दिवसानिमित पोस्टर प्रदर्शन
वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील  विध्यार्थ्यानी श्रीनिवास रामानुजन जीवन चरित्र, रामानुजन सम, गणित विषयातील विविध सूत्रे, सिद्धांत इत्यादी संदर्भात पोस्टर प्रदर्शन केले. या पोस्टर प्रदर्शन कम्पिटीसन स्पर्धेत एकूण ६  विद्यार्थी सहभागी झाले. प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणारा विध्यार्थ्याना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय गणित दिवस तळोदा

पोस्टर प्रदर्शन तळोदा महाविद्यालय


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी.व्ही.रामैया यांनी विज्ञान शाखेतील विध्यार्थ्यानी गणित विषयातील जास्तीत जास्त गोडी निर्माण करावी व गणित विषय चांगला समजून घेतला तर नक्कीच खूपच सोपा आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. या कार्यक्रमात वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस.एन.शर्मा (हिंदी विभाग),प्रा.जे.एन.शिंदे प्रा.डॉ.पी.आर.बोबडे, कमलेश बेडसे, जे.के.पिंपरे,एम.ए.वसावे, जी.एम.मोरे, आर.एल.राजांनी,महेंद्र माळी, आर.डी.मोरे. यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यालयीन अधीक्षक योगेश्वर पंजराळे, मनिष कलाल, राजू हिवरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.



Saturday, November 30, 2019

तळोदा महाविद्यालयात महा- वाकेथान रॅलीचे आयोजन


कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालय तळोदा येथे दिनांक ३०/११/२०१९ रोजी महा -वाकेथान रेलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८:३० वाजता वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रामैय्या यांनी हिरवा ध्वज दाखुवून महा वाकेथान रेलीचे उदघाटन केले.

महा- वाकेथान रेलीचे उदघाटन करतांना प्राचार्य डॉ.पी.व्ही.रामैया

 हि र्रेली महाविद्यालय प्रांगण  ते  स्मारक चौक - बस स्थानक -चिनोदा चौफुली बायपास हायवे मार्ग व वरिष्ठ महाविद्यालय तळोदा पर्यंत २ कि.मी  पायी चालून विद्यार्थी ,प्राध्यापक व महाविद्यालयाचे  कर्मचारी यांनी सहभाग नोदवला. 
Maha Vakethan raili Taloda College Nandurbar
तळोदा महा-वाकेथान र्रेली 

महा - वाकेथान  रेलीचे मुख्य उदिष्ट्ये :

१) रस्ते सुरक्षा संदर्भात जन- जागृती करणे.
२) बोंगे बंदी करणे. 
३) जबाबदार Drawing  संदर्भात माहिती देणे.
४) जबाबदार जीवनशैली या संदर्भात जन-जागृती करणे.

Maha Vakethan Raili taloda College Nanduebar
महा वाकेथान  रेलीत सहभागी विद्यार्थी तळोदा  महाविद्यालय 


महा- वाकेथान रेलीचे समारोप : 
 या महा- वाकेथान रेलीचे समारोप वरिष्ठ महाविद्याल प्रांगणात झाला. प्राध्यापक जे.एन.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, Draving लायसन्स, मोबाईल फोन, व जीवनशैली या संदर्भात माहिती देऊन महा- वाकेथान रेलीचे समारोप केला.
महा- वाकेथान रेली यसस्वीरित्या पार पाळण्यासाठी प्रा. राजू यशोद (N.C.C. Department), प्रा. डॉ. एस.एन.शर्मा (N.S.S. Department) , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक , कर्मचारी इत्यादी यांनी परिश्रम घेतले.
Maha vakeyhan Raili  Taloda College District Nandurbar
महा- वाकेथान रेलीचे समारोप तळोदा महाविद्यालय


    


Wednesday, November 27, 2019

दूरसंवेदन ,शहर व प्रादेशिक नियोजन

भारतीय दूरसंवेदन संस्था (I.I.R.S) व भारतीय अवकाश संशोधन संस्था ( इस्रो) यांच्या संयुक्त  विद्यमानाने ९ ते २० डीसम्बर २०१९  पासून 'दूरसंवेदन व,शहर व प्रादेशिक नियोजन'   (Remote Sensing ,Urban and Regional Palnning) Online Certificate Course  सुरु होत आहे. हा कोर्सेचा कालावधी  दोन आठवडे आहे. म्हणजेच १२ दिवसाचा Online Certificate Course विद्यार्थी व शिक्षक , प्राध्यापकांसाठी मोफत आहे.हा कोर्स पूर्ण  केल्यानंतर पास झालेल्या विध्यार्थ्याला Certificate  दिले जाईल.

Remote Sensing Online Cdrtificatre Course, Free Course

लीस:३ उपग्रह प्रतिमा सातपुडा पर्वत नंदुरबार


आवश्यक कागदपत्रे:

१) १० वी पास झाल्याचे गुणपत्रक
२) १२ वी पास झाल्याचे गुणपत्रक
३) शाळा सोळल्याचा दाखला
४) बी.ए.,/ बी.एस .सी. पास झाल्याचा गुणपत्रक
५) एम.ए./ एम. एस .सी. पास झाल्याचा गुणपत्रक
६) आधार कार्ड
७) एक पासपोर्ट फोटो
८) इमेल आयडी
९) मोबाईल नो.

 टिप :    

  १० वी किवा १२ वी उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थी सुद्धा online Application भरू शकतात.
   बी.ए.,/ बी.एस .सी ला शिकत असलेले विद्यार्थी किवा एम.ए./ एम. एस .सी वर्गात शिकत असलेले  विद्यार्थी  online Application भरू शकतात.

ओनलाईन  सर्टिफिकेट कोर्स मान्यताप्राप्त ठिकाण 

कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र 
            

स्थानिक समन्वयक

मोहन अर्जुन वसावे ( सहा. प्राध्यापक भूगोल विभाग )
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र 
मोबाईल : ८३९०९७८०८८