Tuesday, November 19, 2019

नकाशा व्याख्या व उपयोग

प्रस्तावना:

भूगोलशास्त्राचा अभ्यास करतांना नकाशाला अन्यय साधारण महत्व आहे.तसेच नकाशाशिवाय कोणत्याही देशाचा किंवा प्रदेशाचा बारकाईने अभ्यास करणे शक्य होत नाही. पृथ्वीवरील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी हवाई छायाचित्र व उपग्रह प्रतिमांचा वापर केला जातो.परंतु त्यामध्ये भू-भागावरील विवध घटक एकत्र आलेले असतात.त्यांचा बारकाईने व अचूकपणे अभ्यास करण्यासाठी विशीष्ट तंत्र,साहित्य आणि कौशल्याची गरज असते.

नकाशाची व्याख्या :

"नकाशा म्हणजे संपूर्ण जगाचा किंवा एखाद्या प्रदेशाचा प्रमाण,प्रक्षेपण, सांकेतिक चिन्हे,व खुणा यांच्या साहाय्याने सपाट भू-भागावर तयार केलेली आकृती होय"

स्थलदर्शक नकाशा

नकाशाचा उपयोग : 


१) पृथ्वीवरील नैसर्गिक व सामाजिक घटकाची माहिती समजून घेण्यासाठी नकाशाचा उपयोग केला जातो.

२) एखाद्या विशिष्ठ प्रदेशाचा स्थान व दिशा समजण्यास मदत होते.त्यामुळे त्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे मानवी वस्त्या, उपलब्ध नैसर्गिक साधन संपती  इत्यादी घटकाचे आकलन होते.

३) पृथ्वीवरील वाहतुकीचे  व दळणवळण  सुविधा लगेच लक्षात येतात. त्यामुळे मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लाब प्रवास करायचा असेल तर नकाशाचा आधार घेतात.

४) मानवी वस्त्यांचे प्रारूप व रचना नकाशावरील सांकेतिक चिन्हे व खुणा वरून समजते.

५) नकाशाचे उपयोग भूगोल विषयाचे विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक व संशोधक मोठ्याप्रमाणात केला जातो
.
६) कृषी , जलसिंचन, नगरपालिका, भूमी अभिलेख व वन विभागात विविध प्रकारच्या नकाशाचे उपयोग मोठ्याप्रमाणात केला जातो.
७) नकाशाचा उपयोग  सर्वात जास्त लष्करी विभागात वापर केला जातो. कारण एखाद्या देशाची किंवा शत्रूच्या योग्य ठिकाणाची माहिती जाणून घेण्यासाठी नकाशा वाचनाचे कार्य महत्त्वाचे असते.

3 comments: