Friday, December 27, 2019

दूर संवेदनाचे प्रकार


प्रस्तावना: दूर संवेदन (रिमोट सेंसिंग), ज्याला पृथ्वीचे निरीक्षक असे म्हणतात.  ओब्जेक्ट किंवा क्षेत्राशी थेट संपर्क न ठेवता पृथ्वीच्या भू- भागावरील वस्तू किंवा क्षेत्राबद्दल अचूक माहिती मिळवण्याचे महत्वाचे कार्य दूरसंवेदन प्रणाली करत आहे. मानवाला भू- भागावरील माहिती उपग्रह मार्फत  मिळते. उपग्रहवरून मिळवलेली माहितीला हवाई छायाचित्र असे म्हणतात. या हवाई छायाचित्र व उपग्रह प्रतिमाच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्या प्रदेशात नैसर्गिक आपत्ती  व सामाजिक बदल झाला आहे याची वास्तविक माहिती मिळते. उदा, भूकंप, पूर, भूमिपात, भूमिउपयोजन इत्यादी घटकाची माहिती मिळते.

दूर संवेदनाचे प्रकार :

विद्युत चुंबकीय उर्जास्रोताच्या उगमस्रोतावर आधारित प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

१)    क्रियाशील दूर- संवेदन:

क्रियाशील दूर संवेदन हा दूर संवेदनाचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. या प्रकारात जे साधने वापरली जातात ती  स्वतः उर्जा निर्मिती करणारे असतात. या स्वयंम निर्मित विद्युतचुंबकीय  उर्जेचा वापर करून ज्या प्रदेशाची उपग्रह प्रतिमा घ्यावयाची आहे त्याकेडे ती उर्जा प्लेटफार्मवरून पाठवली जाते. प्रदेशाकडून किंवा लक्षाकडून ती संवेदकाकडे परावर्तीत होते व संवेदाका मार्फत त्या परवर्तीत उर्जेचे सांकेतिक स्वरुपात रुपांतर करून नोंद घेतली जाते. या प्रक्रिया वरून उपग्रह प्रतिमा तयार केली जाते. उदा , रडारमध्ये स्वयमनिर्मित उर्जा असते. त्यामुळे कोणत्याही प्रदेशाची उपग्रह प्रतिमा काढण्यासाठी उच्चदर्जाचे कॅमेरा च्या साहाय्याने स्वच्छ उच्च दर्जाची  उपग्रह प्रतीमा तयार करण्यासाठी रडारमध्ये स्वयमनिर्मित उर्जा महत्वाची कार्य करिते. त्यामुळे कोणत्याही वेळी म्हणजे दिवसा व रात्रीच्या वेळी उपग्रह प्रतिमा काढल्या जातात.
दूरसंवेदनाचे प्रकार, क्रियाशील दूर संवेदन

क्रियाशील दूर संवेदन


२)    निष्क्रिय दूर-संवेदन :

निष्क्रिय दूर संवेदन म्हणजे ज्यात उर्जेचा स्रोत हा नैसर्गिकरीत्या उपलब्ध असून त्या उर्जेचा वापर करून उपग्रह प्रतिमा घेतली जाते. त्यामुळे सूर्यापासून  उर्जा पृथ्वीवर पोहचते व त्याच वेळी उर्जा वातावरणात परावर्तीत होते हि प्रक्रिया दिवसभर सुरु असते. या नैसर्गिक उर्जामार्फत पृथ्वीवरील भौगोलिक व सामाजिक घटकाची  अचूक माहिती उपग्रह प्रतीमामुळे मिळत असते त्याला निष्क्रिय दूर संवेदन संवेदन असे म्हणतात. निष्क्रिय दूर संवेदन उपग्रहावर साधा कॅमेरा बसवलेला असतो. सूर्य सौर उर्जेच्या मार्फत उपग्रह प्रतिमा काढल्या जातात. हा उपग्रह कॅमेरा फक्त दिवसा प्रतिमा काढत असतो.
दूरसंवेदनाचे प्रकार, निष्क्रिय दूर संवेदन

निष्क्रिय दूर संवेदन



1 comment:

  1. खूप छान माहिती दिली आहे सर, mpsc main GS-Paper1भूगोल विषयातील remote sensing हा topic syllabus ला आहे त्यामुळे मीmpsc preparation करत असल्यामुळे माझ्यासाठी ही माहिती व GIS topic फायदेशीर आहे
    -sanjay vasave

    ReplyDelete