Wednesday, December 9, 2020

3D Digital Elevation Model in QGIS 3.10

3D डिजिटल एलिवेशन मॉडेल (3D Digital Elevation Model)

डिजिटल एलिवेशन मॉडेल भौगोलिक माहिती प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचे  तंत्र म्हणून ओळखले जाते. जगामध्ये डिजिटल एलिवेशन मॉडेलचा वापर विविध प्रकारच्या जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सॉफ्टवेअरमध्ये वापर होतो. डिजिटल एलिवेशन मॉडेल म्हणजे पृथ्वीच्या भू-भागावरील प्राकृतिक भूरुपांचा उंचवटा भूरचना याची सखोल माहिती जी.आय.एस. सॉफ्टवेअरमध्ये 3 D मॉडेल निर्मिती केली जाते व आकर्षक  नकाशा 3D स्वरूपात तयार केला जातो. उदा. पर्वत, पठार,मैदान,नद्या सरोवर इत्यादी भौगोलिक भूरुपांची  माहिती या मॉडेलच्या मार्फत मिळते.

3 D Digital Elevation Model

3 D Digital Elevation Model 



 डिजिटल एलिवेशन मॉडेल वरूनच भौगोलिक भूरुपांची उंची, लांबी क्षेत्रफळ इत्यादी घटकांची  अचूक माहिती मिळते म्हणून भूगोल विषयातील संशोधक, प्राध्यापक  विध्यार्थ्यांसाठी  डिजिटल एलिवेशन 3D मॉडेल अत्यंत महत्वाचा आहे. डिजिटल एलिवेशन मॉडेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम हवाई उपग्रह प्रतिमा, ड्रोन कॅमेरा वरून घेतलेल्या प्रतिमा उपग्रह प्रतिमाचा वापर केला जातो,  त्याच बरोबर एस्टर (ASTER) Advanced Spaceborne Thermal Emission Reflection and Radiometer SRTM म्हणजे Shuttle Radar Topography Mission   माहिती घ्यावी लागते.  ही माहिती भौगोलिक माहिती प्रणाली सॉफ्टवेअरमध्ये प्रविष्ट करून त्याच्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून  डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करता येतो. डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी उपग्रह प्रतिमा  महत्वाची आहे.

१.      पृथ्वीवरील प्राकृतिक भूरुपांची वास्तविकता नकाशावर तयार केली जाते.

२.      पर्वत ,पठार व मैदान इत्यादी भूरुपांची समुद्र सपाटीपासून उंची योग्य पद्धतीने काढता येते.

३.      विशिष्ठ पर्वतीय प्रदेशातील नद्यांचा प्रवाह व स्वरूप डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल मार्फत समजते.

3D Digital Elevation Model 



डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी म्हत्वाचे  जी.आय.एस. software :

डिजिटल एलिवेशन थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी विविध प्रकारचे जी.आय.एस. software चा वापर केला जातो. उदा, Arc GIS 108, Global Mapper 21, QGIS 3.10, Grass  SAGA GIS, इ. जी.आय.एस. software चा वापर जगामेध्ये आज मोठ्याप्रमाणात केला जातो.

2 comments: