Thursday, December 17, 2020

ISRO चा सी.एम.एस - 01 संचार उपग्रह प्रक्षेपण

 

ISRO चा सी.एम.एस - 01 संचार उपग्रह प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रो पीएसएलव्ही-सी 50 च्या माध्यमातून आज संप्रेषण उपग्रह सीएमएस -01 लाँच केला . कोरोना युगातील या वर्षी इस्रोची ही दुसरी मोहीम आहे. यासाठी बुधवारी दुपारी सतीश धवन विशेष केंद्राकडून 25 तासांची काउंटडाउन सुरू झाली होती .

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) हे पीएसएलव्हीचे 52 वे मिशन आहे . संचार उपग्रह सी.एम.एस - ११ दुपारी 3.४१  वाजता श्रीहरिकोटाच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून यशस्वीरीत्या  प्रक्षेपित करण्यात आले. सीएमएस - 01 हा इस्रोचा 42 वा संचार उपग्रह आहे. हे देशातील मुख्य भूभाग तसेच अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना विस्तारित सी-बँड सेवा प्रदान करेल. यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी ग्राऊंड मॉनिटरिंग म्हणजे जमानिनीची निगराणी  उपग्रह पीएसएलव्ही -सी 49 च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आला होता.

CMS 01 Satellite


संचार उपग्रह सी.एम.एस- 01 ची प्रमुख वैशिट्ये:

१.सी.एम.एस - 01 उपग्रहामुळे दूरसंचार सेवा सुधारतील. त्याच्या मदतीने टी.व्ही वाहिन्यांची चित्र गुणवत्ता सुधारली जाईल.

2.  आपत्ती व्यवस्थापनादरम्यान सरकारला मदत मिळेल.त्यामुळे प्राणहानी व वित्तहानी कमी होईल.

3. हा उपग्रह २०११ मध्ये प्रक्षेपित केलेल्या जीसॅट - २ टेलिकम्युनिकेशन उपग्रहाची जागा घेईल.

Andaman Island


४.सी.एम.एस - 01 पुढील सात वर्षांसाठी सेवा प्रदान करेल.

५.या उपग्रहामुळे अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना विस्तारित सी-बँड सेवा प्रदान करेल त्यामुळे या बेटावरील हालचाली व सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण केले जाईल.

1 comment: