विभाजित वर्तुळ भूगोल विषयातील महत्वाचा घटक आहे. भूगोल विषयातील विद्यार्थी , शिक्षक , प्राध्यापक व शंसोधक विभाजित वर्तुळ तंत्राचा आधुनिक पद्धतीने वापर करतात. पृथ्वीवरील विविध घटकाची माहितीचे विश्लेषण व पृथ्वकरण करण्यासाठी विभाजित वर्तुळ तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे भू-भागावरील भौगोलिक व समाजिक माहितीचे अचूक आकलन होते." विशिष्ठ प्रमाणाचे एक वर्तुळ तयार करून त्यामध्ये विविध भौगोलिक उपघटकाची आकडेवारी अंशात्मक पद्धतीने दाखविले जाते. त्या आकृतीस विभाजित वर्तुळ असे म्हणतात". या वर्तुळाच्या साहाय्याने एकाद्या विशिष्ठ प्रकारचा नकाशा तयार करिता येतो.नकाशा मध्ये विवध प्रकारची आकडेवारी व त्याचे उपघटक दर्शविण्यासाठी या आकृतीचा उपयोग मोठ्याप्रमाणात केला जातो.उदा, जंगल, शेतीतील विवध पिकांचे उत्पादन, खनिज साधन संपती , लोकसंख्या वितरण,भूमी उपोयाजन, जलसिंचन स्रोत व आर्थिक घटकाची वितरण व उत्पादन इत्यादी घटकाची माहिती विभाजित वर्तुळ पद्धतीने दाखविता येते.
विभाजित वर्तुळ आजच्या युगात संगणक व भौगीलिक महिती प्रणाली Softawre मध्ये कमी वेळात Digital पद्धतीने तयार केला. साधारणपणे QGIS 3.10 GIS Software, Arc GIS 10.6, Global Mapper 21 Software इत्यादी विविध प्रकारच्या GIS Software मध्ये विभाजित वर्तुळ तयार करता येतो.विभाजित वर्तुळ काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो.
उप घटकाचे मूल्य
सूत्र : एक उपघटकाचे अंशात्मक मूल्य = ---------------------------------- x१००
एकूण उप घटकाची मूल्य
नंदुरबार जिल्हा : आदिवासी लोकसंख्या |
![]() |
नंदुरबार जिल्हा : विभाजित वर्तुळ |
विभाजित वर्तुळाचे गुण :
१) कोणत्याही प्रकारची आकडेवारी या वर्तुळमध्ये समजण्यास सोयीस्कर असते.
२) विशिष्ठ प्रदेशातील अंशात्मक आकडेवारी समजण्यास मदत होते.
३) एकाद्या विशिष्ठ प्रदेशातील लोकसख्या , शेतीतील पिकांचे उत्पादन, भूमी उपोयाजन इत्यादी घटकाची वर्गीकरण करता येते.
४) विभाजित वर्तुळ विशिष्ठ प्रमाणाचा आकारचा बनविला जातो.
५) विभाजित वर्तुळ तयार केल्यानंतर आकडेवारीची तुलना करिता येते.
६) या वर्तुळामध्ये अंशात्मक आकडेवारी योग्य पद्धतीने दर्शविता येते.
विभाजित वर्तुळाचे दोष :
१) विभाजित वर्तुळामध्ये एखाद्या प्रदेशाचा नकाशा तयार करायचा असेल तर फक्त विशिष्ठ प्रमाण घेतेले जाते त्यामुळे प्रदेशाच्या आकारात विकृती निर्माण होते.
२) या वर्तुळामध्ये फक्त एकाच घटकाचीआकडेवारी दर्शविता येते.त्यामुळे काही महत्त्वाचे घटक दर्शविता येत नाही.
३) एकदा तयार केलेला वर्तुळामध्ये पुन्हा बदल करिता ये नाही.
विभाजित वर्तुळाची उपयोग :
विभाजित वर्तुळ तंत्राचा वापर साधारणपणे कृषी विभाग , जलसंपदा विभाग , जिल्हा सांख्यिकी विभाग ,भूगोल विषयाचे विद्यार्थी , शिक्षक ,प्राध्यापक व शोंसोधक इत्यादी क्षेत्रात अंशात्मक आकडेवारी विश्लेषण करण्यासाठी उपयोग केला जातो.
No comments:
Post a Comment