Saturday, December 7, 2019

QGIS 3.10 Software Tool Bar मराठीत शिका

प्रस्तावना : QGIS 3.10 Software मध्ये विविध प्रकारच्या टूल बारचा  उपयोग विविध प्रकारच्या नकाशे बनविण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.  QGIS 3.10 GIS Software  मध्ये टूल  बारची  बारकाईने माहिती समजणे महत्त्वाचे आहे.

QGIS 3.10 Tool Bar Marathi

QGIS :3.10 Tool Bar 


1)    New Project :     

 QGIS 3.10 Software open केल्यानंतर  ज्या प्रकारच्या नकाशा  बनवायचा असेल तर त्या नकाशाचे  नवीन प्रोजेक्ट बनविणे आवश्यक असते. उदा, रस्तेमार्ग , रेल्वेमार्ग , भूमी उपोयाजन व लोकसंख्या वितरण, घनता इत्यादी प्रकारचा नकाशा बनविण्यासाठी प्रत्येक नकाशाचा नाविन प्रोजेक्ट बनवावा लागतो. 

2) Open Project :


एख्याद्या वेळी परत त्याच प्रकारचा जर नकाशा बनवायचा असेल तर आपण बनविलेला नकाशा प्रोजेक्ट ओपेन करून कमी वेळात नकाशाबनविता येतो.म्हणून ओपेन प्रोजेक्ट वापर QGIS 3.10 Software     वापर केला जातो.

3) Save Project :


आपण बनविलेला  किंवा बनविलेला प्रोजेक्ट कायमस्वरूपी QGIS Software Save करण्यासाठी  Save Project  टूलबारचा उपयोग केल केला जातो.

4) New Print Layout : 


या टूलबारचा उपयोग साधारणपणे आपण बनविलेल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये  नकाशा designed करण्यासाठी केला जातो.QGIS 3.10 software  मधील सर्वात महत्त्वाचे टूलबारआहे.या टूलबारमध्ये  उत्तर दिशा, नकाशा प्रमाण , शुची,  सांकेतिक चिन्अहे व खुणा अक्षवृत्त ,रेखावृत्त  तयार केले जातात.


5) Show Layout Manager : 


आपण बनविलेला नकाशा पुन्हा बघण्यासाठी Show Layout Manager
वर क्लीक केल्यानंतर आपण सेव केलेला नकाशा पुन्हा पुन्हा बघता येतो. म्हणन या टूल बारचा वापर QGIS User  मोठ्या प्रमाणात करतात.

 6) Style Manager : 

 एखाद्या प्रकारचा नकाशा बनविल्या नंतर त्या नकाशाला विविध प्रकारचे  Style ध्यावी लागते. नकाशा उठावदार दिसावा म्हणून Style Manager  क्लिक करून विविध प्रकारची Style दिली जाते.


QGIS 3.10 Style Manager Tool Bar Marathi

QGIS 3.10 Style Manager Tool



7) Pan Map  :

 QGIS 3.10 Software मध्ये आपण तयार केलेला नकाशा Pan Map टूल बार क्लिक करून कोणत्याही प्रकारचा नकाशा सरकवता येतो म्हणजेच Move करता येते.
             

 8) Pan Map to Selection : 

QGIS 3.10 Software मध्ये नकाशा open करा Pan Map to Selection टूलबारवर  क्लिक केल्यानंतर  नकाशा सरकवता येतो. सहसा या टूल बारचा जास्त वापर केला जात नाही.

9)  Zoom In : 

नकाशा मोठा करण्यासाठी या टूल बारचा वापर केला जातो. नकाशातील एखादा लहान भागाची निरीक्षण किंवा सविस्तर पाहण्यसाठी Zoom in Tool चा वापर QGIS User वापर करतात.


10) Zoom Out : 

 नकाशा मोठा केलेला असेल आणि लहान किंवा योग्य आकार करण्यासाठी Zoom Out  टूल बारचा वापर  प्केरामुख्लायाने केला जातो.


  11) Zoom Full : 

एका क्लिकवर  नकाशा लहान किंवा मोठा केला जातो. कमी वेळात नकाशा लहान व मोठा केला जातो.


 12)  Zoom to Selection : 

या टूलबारवर क्लिक केल्यानंतर नकाशा एख्याद्या भागावर क्लिक करा तो भाग एका क्लिक वर मोठा किवा लहान होईल.











   
















4 comments: