डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) हे भौगोलिक माहिती प्रणालीमधील एक अत्यंत
महत्वाचे मॉडेल आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील उंचवटा किंवा चढ-उतार भौगोलिक
प्रदेशाचे अचूक माहितीचे प्रतिनिधींतत्व डिजिटल एलिव्हेशन मॉडेल मार्फत
होते. कोणत्याही
डिजिटलचा संदर्भ घेण्यासाठी डिजिटल एलिव्हेशन मॉडेलचा वापर वारंवार केला जातो. भूप्रदेशातील विशेषता व स्वरूप निश्चित
करण्यासाठी भौगीलिक माहिती प्रणालीतील या टूलचा वापर केला जातो. एखाद्या प्रदेशातील नदीचे खोरे, पर्वतीय प्रदेश, सरोवर, तलाव, इत्यादी भूप्रदेशातील वैशिष्ट्ये
डीईएम मार्फत नेटवर्क
ओळखता येतात. डीइएम तंत्र नदीचे खोरे व
त्यातील नैसर्गिक पर्यावरणीय घटक अभ्यास करण्यासाठी सर्वाधिक वापर केला जातो.
![]() |
Digital Elevation Model |
डीईएम म्हणजे काय :
डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) एक विशिष्ट प्रकारचा
डेटाबेस
आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील जमिनीचे सर्वेक्षण व डीईएम उपग्रह प्रतीमा डेटा कॅप्चर करून
त्याचे भौगोलिक माहिती प्रणाली सोफ्टवेअर मार्फत विश्लेषण करून एक विशिष्ठ
प्रकारचा नकाशा तयार केला जातो त्यास डिजिटल
एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) असे म्हणतात.
डीईएम नकाशा तयार करण्यासाठी जी.आय.एस
सॉफ्टवेअर:
१. सागा जी.आय.एस. (SAGA GIS) सोफ्टवेअर सर्वात प्रभावी डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (डीईएम) उपग्रह प्रतिमाचे विश्लेषण करणारे टूल्स आहे. हे सोफ्टवेअर मोफत वापरत येते.
Very good information
ReplyDelete